शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 16:08 IST

नाशिक जिल्हा रेडझोनमधून बाहेर आल्याने जिल्हयाला लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यास जिल्हा पात्र ठरला आहे. त्यापाश्व'भूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हातील कोरोनास्थितीचा आढावा घेत जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा दिला आहे.

ठळक मुद्देलग्न सोहळ्याला असलेले निर्बंध देखील पुर्वीप्रमाणेच कायम आता सर्व दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत उघडता येणार

नाशिक: नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ८.११ टक्के तसेच ऑक्सीजन बेडस‌् ४० टक्केपेक्षा कमी वापरात असल्याने जिल्ह्याला लागू असलेले निर्बंध १ जून पासून काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत अत्यावश्यक  दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर हॉटेल्स आणि मद्य दुकानांवर असलेले निर्बंध कायम असून त्यांना केवळ पार्सल सुविधा देता येणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसह लग्न सोहळ्याला असलेले निर्बंध देखील पुर्वीप्रमाणेच कायम राहाणार आहेत.नाशिक जिल्हा रेडझोनमधून बाहेर आल्याने जिल्हयाला लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यास जिल्हा पात्र ठरला आहे. त्यापाश्व'भूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हातील कोरोनास्थितीचा आढावा घेत जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सर्वप्रकारची दुकाने खुली होणार आहेत. यापूर्वी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ११ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली होती. आता सर्व दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत उघडता येणार आहेत. अत्यावश्यक सेवेच्या आस्थापना त्यामध्ये मैडीकल, दवाखाने, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यवसाय पुर्वीप्रमाणेच सुरू राहतील.सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत. अंत्यविधीसाठी केवळ २० जणांनाच परवानगी असेल तर त्यानंतरच्या धार्मिक विधींसाठी केवळ १५ जणांना परवानगी असलेली परवानगी कायम आहे. लग्न सोहळ्यांना असलेली बंदी कायम असून केवळ नोंदणी विवाहांनाच परवानगी असणार आहे. मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृहे, व्यायामशाळा, सभागृहे लॉन्स, मंगल कार्यालये पुढील आदेशापर्यंत बंदच राहाणार आहे.शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती २५ टक्के इतकी असणार आहे. कृषी क्षेंत्राशी संबंधित दुकानांना वेळ वाढवून देण्यात आलीअसून सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत त्यांची दुकाने सुरू राहाणार असल्याचे भुजबळ यांनी जाहिर केले.हॉटेल्स, मिठाईची दुकाने, बेकरी, ढाबे यांना केवळ होम डिलीव्हरीलाच परवानगी असेल. त्यांना दुकाने सुरू करता येणार नाही. सकाळी ७ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत ते पार्सल सुविधा पुरवू शकणार आहेत. बँका, पोस्ट कार्यालयांचा व्यवहार हा सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेतच सुरू राहिल. मुद्रांक नोंदणीचे कार्यालय नियमाप्रमाणे सुरू राहाणार

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयSuraj Mandhareसुरज मांढरेChagan Bhujbalछगन भुजबळ