शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे कापले दुचाकीस्वाराचे नाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 19:41 IST

 नाशिक : दुचाकीवरून जात असलेल्या चालकाचे नायलॉन मांजामुळे नाक कापले गेल्याची घटना शनिवारी (दि़१३) सकाळी सिडकोतील कामटवाडे परिसरात घडली आहे़ राधेश्याम पांडे (५०, रा. अंबड लिंकरोड) असे नाक कापले गेलेल्या इसमाचे नाव असून नायलॉन मांजामुळे नाकास तब्बल सात टाके पडले आहेत़अंबड - लिंकरोड परिसरातील पांडे हे सकाळी दुचाकीवरून त्रिमूर्ती चौकाकडे ...

ठळक मुद्दे सिडकोतील कामटवाडे परिसरात घटना नायलॉन मांजा बाळगणा-यांवरच गुन्हे दाखल करण्याची मागणी

 नाशिक : दुचाकीवरून जात असलेल्या चालकाचे नायलॉन मांजामुळे नाक कापले गेल्याची घटना शनिवारी (दि़१३) सकाळी सिडकोतील कामटवाडे परिसरात घडली आहे़ राधेश्याम पांडे (५०, रा. अंबड लिंकरोड) असे नाक कापले गेलेल्या इसमाचे नाव असून नायलॉन मांजामुळे नाकास तब्बल सात टाके पडले आहेत़अंबड - लिंकरोड परिसरातील पांडे हे सकाळी दुचाकीवरून त्रिमूर्ती चौकाकडे दुचाकीवरून जात होते़ त्यावेळी अचानक त्यांच्या तोंडासमोर मांजा आल्याने त्यांचे नाक कापले जाऊन ते खाली पडले़ यावेळी परिसरातील नागरिकांनी त्वरीत धाव घेऊन डॉ़दिनेश भामरे यांच्याकडे प्राथमिक उपचारासाठी नेले़ मात्र, त्यानंतरही रक्तस्त्राव सुरूच असल्याने पांडे यांना मोरे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर उपचारासाठी नाकास सात टाके टाकावे लागले़दरम्यान, पांडे यांच्या नाकाऐवजी त्यांच्या गळ्यास जर मांजा लागला असता तर त्यांचा गळाच कापला जाऊन मोठी दुर्घटना घडली असती मात्र सुदैवाने ते वाचले़ या घटनेमुळे सिडकोत सर्रास नायलॉन मांजाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे़ पक्षीप्रेमी व पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही नायलॉन मांजाचा वापर केला जातो आहे़ त्यामुळे पोलिसांनी आता नायलॉन मांजा बाळगणा-यांवरच गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्रीसिडको परिसरासह संपूर्ण शहरात चोरी - छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री सुरूच असून विक्रेत्यांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात आहेत़ यापुर्वी शहर गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यांमध्ये फुल तसेच पादत्राणे विक्रीच्या दुकानात हा मांजा ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे़ विशेष म्हणजे दुकानात नायलॉन मांजा न ठेवता दुसरीकडे ठेवून ग्राहकाकडून संपूर्ण पैसे घेतल्यानंतर त्यास चोरी-छुप्या पद्धतीने दिला जातो़

टॅग्स :NashikनाशिकCrimeगुन्हाPoliceपोलिस