जिल्ह्यात वाढली टॅँकर्सची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 03:01 PM2019-04-22T15:01:39+5:302019-04-22T15:02:45+5:30

नाशिक : उन्हाची तीव्रता वाढत आहे तशी पाण्याची टंचाईदेखील जाणवत असल्यामुळे आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत पाणी नियोजनावर भर देण्याच्या ...

nashik,number,of,tankers,increased,in,district | जिल्ह्यात वाढली टॅँकर्सची संख्या

जिल्ह्यात वाढली टॅँकर्सची संख्या

googlenewsNext
ठळक मुद्देनियोजनाच्या सूचना : पाणी पातळी खालावली, धरणात १९ टक्के साठा


नाशिक : उन्हाची तीव्रता वाढत आहे तशी पाण्याची टंचाईदेखील जाणवत असल्यामुळे आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत पाणी नियोजनावर भर देण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांकडून देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या टॅँकर्सच्या संख्येत वाढ झाली असून, सिन्नर आणि नांदगाव या तालुक्यांमध्ये सर्वाधिक टॅँकर्सची संख्या झाली आहे. जिल्ह्यात २६८ टॅँकरद्वारे गाव आणि वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.
कमी पर्जन्यमानामुळे यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून, पाणी टॅँकर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात २० टॅँकर्सची संख्या वाढली असून, सिन्नर आणि नांदगावमध्ये सर्वाधिक ५१ टॅँकर्स सुरू आहेत. त्याबरोबरच मालेगाव आणि येवला, बागलाण, चांदवड या तालुक्यांमध्ये टॅँकर्सची मागणी वाढली आहे. आणखी काही तालुक्यांमधून टॅँकर्सच्या मागणीची नोंद होत आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाभरात पाणीपुरवठा करणाऱ्या २१८ टॅँकर्सची संख्या आता २३८ वर पोहचली आहे. टॅँकरची ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्याच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत.
गेल्या १४ एप्रिल रोजी जिल्ह्यात २१८ टॅँकर्सद्वारे गाव आणि वाड्यांना ८४० ठिकाणी पाणीपुरवठा केला जात होता. आताही ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याच्या टॅँकरची मागणी गावागावातून होऊ लागली आहे. जिल्हाभरातून आलेल्या मागणीनुसार गेल्या आठवड्यात २० टॅँकर्स वाढविण्यात आले आहेत.

Web Title: nashik,number,of,tankers,increased,in,district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.