nashik,mohan,bhagwat,on,private,tour,from,nashik | खासगी कामानिमित्त मोहन भागवत २० पासून नाशिक दौऱ्यावर

खासगी कामानिमित्त मोहन भागवत २० पासून नाशिक दौऱ्यावर

नाशिक : राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे खासगी दौऱ्यानिमित्त नाशिक दौºयावर येत असून, पाच दिवस त्यांचा नाशिकमध्ये मुक्काम असणार आहे. भागवत हे बुधवारी (दि.२०) नागपूर येथून रेल्वेने नाशिकमध्ये पोहोचणार आहे. सदर दौरा खासगी असून, शहरातील काही कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहणार आहेत. दि. २४ रोजी रात्री ते नाशिकहून नागपूरला परतणार आहेत.
राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दौºयाची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. भागवत यांना झेड दर्जाची सिक्युरिटी असल्याने त्यांच्या आगमन आणि मुक्कामाची जबाबदारी पोलीस आणि जिल्हा प्रशासन पार पाडणार आहेत. दि. २० रोजी भागवत हे दुपारी २ वाजता नागपूरहून नाशिकसाठी रवाना होतील. दुसºया दिवशी सकाळी १२.३० वाजता त्यांचे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आगमन होणार आहे. या खासगी दौºयात भागवत हे सातपूर येथील एका आप्तेष्टांकडे उतरणार आहेत.
दुसºया दिवशी दि. २१ रोजी सायंकाळी ५ वाजता कृषीनगर येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर ५.३० वाजता गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुल येथील कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २२ ते २४ दरम्यान मोहन भागवत हे शहरातील काही आप्तेष्टांच्या भेटी घेणार आहेत. दि. २४ रोजी ते रेल्वेने पुन्हा नागपूरकडे प्रयाण करणार आहेत.

Web Title: nashik,mohan,bhagwat,on,private,tour,from,nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.