मिरजकर फसवणुकीतील संशयितांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 13:28 IST2018-08-04T13:24:26+5:302018-08-04T13:28:05+5:30
नाशिक : आर्थिक गुंतवूणक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून शेकडो गुंतवूणकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांनी अटकपुर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे़ जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़आऱदेशमुख यांच्या न्यायालयात आज या जामीन अर्जावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे़

मिरजकर फसवणुकीतील संशयितांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
नाशिक : आर्थिक गुंतवूणक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून शेकडो गुंतवूणकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांनी अटकपुर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे़ जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़आऱदेशमुख यांच्या न्यायालयात आज या जामीन अर्जावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे़ दरम्यान, या निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे़
एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या मिरजकर सराफ गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात तक्रारदारांची संख्या वाढते आहे़ आतापर्यंत २५० तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे जबाब नोंदविले असून फसवणूकीची रक्कम दहा कोटी रूपयांपर्यत पोहोचल्याचीमाहिती पोलीस सूत्रांनी दिली़ या गुन्ह्यामधील फरार संशयितांपैकी आशितोष चंद्रात्रे यास पोलिसांनी अटक केली तर उर्वरीत संशयित महेश मिरजकर, सुरेश भास्कर, भरत सोनवणे, विशाल नगरकर, विजयदिप पवार, प्राजक्ता कुलकर्णी व किर्ती हर्षल नाईक यांनी अॅड़ एम. वाय. काळे यांच्यामार्फत तर संशयित श्रेयस आढावतर्फे अॅड. आर. आर. परासाते यांनी तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायाधीश देशमुख यांनी या सर्वांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत अंतिम निर्णयासाठी ४ आॅगस्ट ही तारीख दिली होती़
या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आशितोष चंद्रात्रे यास न्यायालयाने सोमवार (दि़६) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ त्याने आपण पेढीतील कामगार असल्याचे स्पष्ट केले असले तरी तो मिरजकर कुटुंबियांचा जवळचा नातेवाईक असल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून अटकपुर्व जामीनासाठी प्रयत्न करणा-यांचा अटकेचा फैसला आज होणार आहे़