शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

शारीरीक , मानसिक आरोग्यासाठी योगाचा विशेष फायदा ; जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 18:15 IST

नाशिक : सकाळची थंड हवा अन् बासरीच्या सुमधूर स्वरांसोबत शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे वरीष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि शहरवासिय हे सर्व गुरुवारी (दि़२१) योगसाधनेत लीन झाले होते़ निमित्त होते जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकमत, नाशिक शहर पोलीस आयुक्तालय व योग क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग शिबिराचे़

ठळक मुद्देजागतिक योग दिन : योगाची प्रात्यक्षिके पोलीस अधिकाऱ्यांसह शहरवासियांचा सहभाग

नाशिक : सकाळची थंड हवा अन् बासरीच्या सुमधूर स्वरांसोबत शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे वरीष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि शहरवासिय हे सर्व गुरुवारी (दि़२१) योगसाधनेत लीन झाले होते़ निमित्त होते जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकमत, नाशिक शहर पोलीस आयुक्तालय व योग क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग शिबिराचे़

पोलीस आयुक्तालयातील बराक नंबर सतरासमोर आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरामध्ये योग क्रीडा प्रबोधिनीचे डॉ. प्रेमचंद जैन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आसनांची प्रात्यक्षिके आणि माहिती साधकांना देण्यात आली. शिबिराची सुरुवात मानेच्या हालचालीने झाल्यानंतर स्कंध संचलन, मेरूदंड संचलन, जानू संचलन तसेच दंडस्थिती, बैठकस्थिती, शयनस्थिती आदि आसनांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. डॉ. प्रेमचंद जैन यांनी साधकांना मार्गदर्शन करताना प्रत्येक आसन कसे करायचे, आसन करताना कुठली काळजी घ्यायची यांसह आसनांपासून मिळणारे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृतीत योग साधनेला विशेष महत्त्व असून, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचा विशेष फायदा होत असून योग ही साधना असून ती आयुष्यभर करावी असा सल्ला जैन यांनी दिला़

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महापौर रंजना भानसी यांनी ‘लोकमत’ने योगदिनी राबविलेल्या या विशेष उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या, तसेच योग साधनेत सातत्य राखण्याचे आवाहन केले. ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी प्रास्ताविकात योग साधनेला समारोप नसतो, ही साधना अखंडितपणे सुरू ठेवावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महापौर रंजना भानसी, पंचवटीचे माजी प्रभाग सभापती तथा नगरसेवक अरुण पवार, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे, अशोक नखाते, विजयकुमार चव्हाण,भागवत सोनवणे, मोहन ठाकूर व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आले़ लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांच्या हस्ते योगसाधनेवरील पुस्तके देऊन प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले़ यावेळी उपस्थित साधकांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या योग शिबिरास वरीष्ठ पोलीस अधिकारी, महिला व पोलीस कर्मचारी, लहान मुले यांचा विशेष सहभाग होता.योगाबरोबरच हास्ययोगहीपोलीस मुख्यालयातील बराक नंबर १७ समोर झालेल्या या योग शिबिरात आनंद हास्य क्लबचे अ‍ॅड. वसंतराव पेखळे आणि योग शिक्षकांनी हास्ययोगाचे सादरीकरण केले. ‘लय भारी, लय भारी, लय भारी है’ यापासून हास्ययोगाची सुरुवात झाली, तसेच ‘नको औषध नको गोळ्या, हसत हसत वाजवा टाळ्या’ याप्रकारे विशिष्ट टाळ्या वाजवून हास्ययोग व व्यायाम यांची सांगड असलेली प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यानंतर ‘ब्रेन वॉशिंग’, ‘टेन्शन रिलीज’ यांच्या प्रात्यक्षिकांसह दीर्घश्वसनाच्या अभ्यासाबाबत साधकांना मार्गदर्शन करण्यात आले़

शिबिरात या योग प्रकारांची प्रात्यक्षिके योग क्रीडा प्रबोधिनीचे डॉ. प्रेमचंद जैन यांनी योगसाधने अंतर्गत ‘शिथिलीकरणांतर्गत मानेच्या हालचाली, स्कंध संचालन, मेरूदंड संचलन, जानू संचलन, ‘दंडस्थिती’ अंतर्गत ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, ‘बैठक स्थिती’ अंतर्गत भद्रासन, वज्रासन, अर्ध आणि पूर्ण उष्ट्रासन, उत्तान मंडूकासन, शशांकासन, वक्रासन, ‘शयनस्थिती’ अंतर्गत अर्ध उत्तानपादासन, अर्ध हलासन, सेतू बंधासन, पवन मुक्तासन, शवासन, ‘श्वसन अभ्यास’ अंतर्गत कपालभाती, अनुलोम - विलोम, शीतली, भ्रामरी आदि योग प्रकारांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आणि साधकांकडून श्वसन ध्यान संकल्प करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकYogaयोगPoliceपोलिस