नाशिक : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून अंडा-भुर्जीची गाडी चालविणाºया युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि़३१) रात्रीच्या सुमारास गंगाघाटावरील शिवांजली हॉटेलच्या समोर घडली़ महेंद्र विष्णू नेहरे असे जखमी युवकाचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत़पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगाघाटावरील नारोशंकर मंदिरासमोर असलेल्या शिवांजली हॉटेल समोरच्या परिसरात नेहरे हा अंडा-भुर्जी हातगाडी लावतो. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील वज्रेश्वरीनगर झोपडपट्टीत राहणारा संशयित पप्पू राजू शिंदे हा हातगाडीवर येऊन त्याने अंडा-भुर्जी खाल्ली़ त्यानंतर हातगाडीचालक नेहरे याच्याकडे दारू पिण्यासाठी २० रुपयांची मागणी केली, मात्र नेहरे याने पैसे देण्यास नकार दिला व त्याचा राग आल्याने संशयित शिंदे याने कुरापत काढून हातातील धारदार कोयत्याने नेहरेच्या डोक्यावर वार करून जखमी केले.या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितास अटक केली़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित शिंदेवर गुन्हा दाखल केला आहे़
दारूसाठी पैसे न दिल्याने युवकावर कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 17:07 IST
नाशिक : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून अंडा-भुर्जीची गाडी चालविणाºया युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि़३१) रात्रीच्या सुमारास गंगाघाटावरील शिवांजली हॉटेलच्या समोर घडली़ महेंद्र विष्णू नेहरे असे जखमी युवकाचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
दारूसाठी पैसे न दिल्याने युवकावर कोयत्याने वार
ठळक मुद्देगंगाघाटावरील घटना : संशयितास अटक पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल