भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्ताने व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 18:57 IST2019-04-15T18:55:07+5:302019-04-15T18:57:39+5:30
नाशिक : भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळयाच्या निमित्ताने बुधवार दि. १७ पासून तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ...

भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्ताने व्याख्यानमाला
नाशिक: भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळयाच्या निमित्ताने बुधवार दि. १७ पासून तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री जैन सेवा कार्य समितीच्यावतीने देण्यात आली.
श्रीजैन सेवा कार्य समिती, आर.डी.ग्रुप, भारतीय जैन संघटना, महावीर इंटरनॅशनल आदिंच्या संयुक्त विद्यमाने येत्या बुधवार पासून प.सा. नाटयमंदिर येथे सायंकाळी ७ वाजता सदर व्याख्याने होणार आहेत.
बुधवार दि.१७ रोजी डॉ. अनिल अवचट यांचे ‘आजची बदलती संस्कृती’ या विषयावर, दि. १८ रोजी उत्तमराव कांबळे यांचे ‘थोडसं डोक्याने चालू या’ या विषयावर तर दि. १९ रोजी सचिन जोशी यांचे ‘विचार कसा करावा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन सुनील बुरड, राजु धाडीवाल, यतीश डुंगरवाल, अनिल नहार, राजेंद्र डुंगरवाल, पारस बाफणा, महावीर राका, आशय राका, गौतम सुराणा आदिंनी केले आहे.