शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांची कोकण किनारपट्टीच्या पर्यटनाला पसंती

By admin | Updated: April 4, 2017 02:16 IST

नाशिक : शाळांच्या उन्हाळी सुट्या लवकरच सुरू होणार असल्याने पालकांनी आपल्या आवडीच्या ठिकाणी सहलीला जाण्याचे बेत आखण्यास सुरुवात केली आहे.

 नाशिक : बारावीची परीक्षा संपली असून, दहावीची परीक्षाही संपली आहे. तसेच शाळांच्या उन्हाळी सुट्या लवकरच सुरू होणार असल्याने पालकांनी आपल्या आवडीच्या म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी सहलीला जाण्याचे बेत आखण्यास सुरुवात केली आहे. यंदा नाशिककरांकडून देश- विदेशांतील विविध पर्यटन स्थळांसोबतच कोकण पर्यटनाला विशेष पसंती मिळत आहे. परंतु, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांना सामोरे जावे लागणार असल्याने वेळेच्या अभावामुळे आणि आर्थिक दृष्टीने परवडणाऱ्या स्थळांचा विचार करताना पर्यटकांकडून महाबळेश्वर आणि कोकणपट्ट्याचे पर्यटन करण्याचे बेत आखले जात आहेत.शाळा व महाविद्यालयांना लवकरच सुट्या लागणार असून अनेकांनी उन्हाळी पर्यटनाच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. देश-विदेशातील पर्यटनासोबतच नाशिककर पर्यटक खिशाचे बजेट पाहून देशांतर्गत व राज्यातील पर्यटन स्थळांच्या सहलींचे नियोजन करीत आहेत. अनेक पर्यटक विविध यात्रा कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये जाऊन चौकशी व बुकिंग करताना दिसत आहेत. तर आॅनलाइन बुकिंग करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. सुट्यांमधील विशेष योजना, विमानाचे तिक ीट, परदेशी चलन, पर्यटन विमा, पासपोर्ट व विजा, हॉटेल बुकिंग आदि सेवा पुरविणाऱ्या यात्रा कंपन्यांना पर्यटक अधिक प्राधान्य देत आहेत. देशांतर्गत प्रवासासाठी बहुतांश पर्यटक रेल्वे व बसेसला प्राधान्य देत आहेत. यातील बहुतेकांनी विविध यात्रा कंपन्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहलींचे नियोजन केले आहे. अनेक जण राज्यातील सहलींनाच जाण्याचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी राज्यातील महाबळेश्वर, माथेरान व कोकण पट्ट्यासह विविध लेणी व धार्मिक स्थळांच्या सहलीसाठीही पर्यटकांमध्ये उत्सुकता आहे. त्यासाठी विविध यात्रा कंपन्यांच्या माध्यमातून बुकिंग करण्यात येत आहे. तर अनेक जण अजूनही यात्रा कंपन्यांच्या संकेतस्थळावरून आल्हाददायक व खिशाला परवडणाऱ्या पर्यटन स्थळांचे पर्याय शोधत आहेत. महाराष्ट्र पर्यटन विभागाकडूनही पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध योजना आखण्यात आल्या असून, येथे संपर्क साधणाऱ्या पर्यटकांना विभागाशी संलग्न विविध पर्याय सुचवले जातात. त्यामुळे पर्यटकांना कमी खर्चातही पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकतो. (प्रतिनिधी)