शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

जळगावी वांग्यावर नाशिककर फिदा, भरीत भाकरीची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 11:33 AM

नाशिक : खान्देशबहुल वस्ती असणाºया सिडकोसह शहरात सर्वत्र जळगावी वांग्याला पसंती मिळत आहे. जळगाव, भुसावळ सह आजुबाजुच्या खेड्यातुन येणाºया या लांबट, गोल आकारातील पांढºया, हिरव्या वांग्यांवर ग्राहकांच्या अक्षरशा उड्या पडत आहेत. चवदार, स्वच्छ निघणाºया या वांग्यांचे भरीत हिवाळ्यात खाल्यास आरोग्यदायी मानले जात असल्याने त्याला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ...

ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समितीसह उपनगरात मेथी, मटार, कांदापात, गाजराला मागणीवांग्यांचे दर २५ ते ३० रुपये किलो अशा परवडणा-या दरात

नाशिक : खान्देशबहुल वस्ती असणाºया सिडकोसह शहरात सर्वत्र जळगावी वांग्याला पसंती मिळत आहे. जळगाव, भुसावळ सह आजुबाजुच्या खेड्यातुन येणाºया या लांबट, गोल आकारातील पांढºया, हिरव्या वांग्यांवर ग्राहकांच्या अक्षरशा उड्या पडत आहेत. चवदार, स्वच्छ निघणाºया या वांग्यांचे भरीत हिवाळ्यात खाल्यास आरोग्यदायी मानले जात असल्याने त्याला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वांग्यांचे दर २५ ते ३० रुपये किलो अशा परवडणाºया दरात असल्याने आणि सोबतच मेथी, कांद्याची पात, मटार यांचेही दर कमी असल्याने भरताची भट्टी चांगली जमून येत आहे. हिवाळ्याचे तीन महिने नाशिकच्या बाजारात हे जळगावी वांगी भाव खाऊन जात असल्याचे येथील भाजीविक्रेत्यांनी सांगितले. उर्वरित आठ महिने मात्र नाशिक जिल्ह्यात पिकणाºया वांग्यांना मागणी असते. वांग्याच्या भरीताबरोबरच भाकरी किंवा पोळीच्या जोडीला मेथी, मुळापाला, कांदा पात यापासून तयार केलेला खुडा खाल्ला जातो. सध्या पालेभाज्यांचे दर अत्यंत कमी असल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. जळगावी वांगी सध्या नाशकात सर्वत्र मुबलक मिळत असले तरी लग्नसराई वा इतर कारणांमुळे जळगावला जाणाºयांकडून, नियमीत अपडाऊन करणाºयांकडूनही या वांग्याची खरेदी केली जात आहे. शेतांवर होणाºया हुरडा पार्ट्यांमध्ये भरताला मागणी आहे. हॉटेल, ढाबे आदि ठिकाणीही भरीत भाकरीच्या डिशची फर्माइश केली जात आहे. बाजारात मटार, गाजर ४० रुपये किलो तर मेथी ५, कांदापात ५ ते १० रुपये प्रतिजुडी दराने मिळत आहे. हिवाळ्यात सध्या निरनिराळ्या भाज्यांची मुबलक प्रमाणात रेलचेल झाली असून गृहिणींचा डब्याचा प्रश्न चुटकीसरशी सुटला आहे तर दररोज वैविर्ध्यपुर्ण पोषक भाजी मिळत असल्याने घरातील सदस्यही आनंद व्यक्त करत आहेत.

 

 

 

टॅग्स :Nashikनाशिकvegetableभाज्याcidcoसिडको