नाशिककर सौंदर्यवतींची ‘चेतक फेस्ट’मध्ये बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:48 IST2019-01-08T00:47:50+5:302019-01-08T00:48:08+5:30

राज्य पर्यटन महामंडळ व सारंगखेडा चेतक फेस्टिव्हल समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेच्या पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्या नाशिककर सौंदर्यवती ठरल्या. येथील फॅशन डिझायनर सीमा गरुड यांनी प्रथम क्रमांक पटकावून ‘मिसेस सारंगी’चा बहुमान मिळविला, तर नम्रता विभुते यांनी दुसरा क्रमांक पटकावला.

Nashikkar beauty parade 'Chetak Fest' | नाशिककर सौंदर्यवतींची ‘चेतक फेस्ट’मध्ये बाजी

नाशिककर सौंदर्यवतींची ‘चेतक फेस्ट’मध्ये बाजी

नाशिक : राज्य पर्यटन महामंडळ व सारंगखेडा चेतक फेस्टिव्हल समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेच्या पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्या नाशिककर सौंदर्यवती ठरल्या. येथील फॅशन डिझायनर सीमा गरुड यांनी प्रथम क्रमांक पटकावून ‘मिसेस सारंगी’चा बहुमान मिळविला, तर नम्रता विभुते यांनी दुसरा क्रमांक पटकावला.  नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्यात सुरू असलेला चेतक फेस्टिव्हल अंतिम टप्प्यात आला आहे. या फेस्टिव्हल अंतर्गत घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत राज्यातील बहुतांश महिलांनी सहभाग नोंदविला होता. या राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिककर महिलांनी बाजी मारली. मिसेस सारंगीचा किताब सीमा गरुड यांनी पटकाविला. त्यांना प्रशस्तिपत्रक, स्मृतिचिन्ह व ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या ठरलेल्या नाशिकच्या नम्रता विभुते यांना ३१ हजार रुपयांचे रोख तर तृतीय क्रमांक राखणाऱ्या शीतल बांगर यांना २१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. टॉप-६ मध्ये चार नाशिककर महिलांची निवड झाली होती. त्यामध्ये तीन विजेत्या ठरल्या. स्पर्धेचे परीक्षण जितेश निकम, स्वाती ठाकूर, नूतन मिस्त्री यांनी केले. यावेळी नाशिककर महिलांनी ‘रॅम्प वॉक’ करत दाखविलेली झलक लक्ष वेधून गेली.

Web Title: Nashikkar beauty parade 'Chetak Fest'

टॅग्स :Nashikनाशिक