शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांवर पोलीस कर्मचा-याच्या नातेवाईकाची दबंगगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 19:30 IST

नाशिक :  वडाळा पाथर्डीरोडवरील केंम्ब्रिज शाळेसमोर बेशिस्तपणे वाहने उभ्या करणा-या तीस वाहनधारकांवर शहर वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले व पथकाने सोमवारी (दि़८) सकाळी कारवाई केली़ या शाळेसमोरील वाहनांची वर्दळ तसेच पाल्यांच्या पालकांकडून रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत होते़ त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती़ दरम्यान वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू असतानाच एका महिला पोलीस कर्मचा-याच्या पतीनेच पोलिसांशी वाद घातल्याची घटना घडली़

ठळक मुद्देवडाळा पाथर्डी रोड : केंम्ब्रिज शाळेसमोरी रस्त्यावर बेशिस्त पार्किंग तीस वाहनधारकांवर कारवाई

नाशिक :  वडाळा पाथर्डीरोडवरील केंम्ब्रिज शाळेसमोर बेशिस्तपणे वाहने उभ्या करणा-या तीस वाहनधारकांवर शहर वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले व पथकाने सोमवारी (दि़८) सकाळी कारवाई केली़ या शाळेसमोरील वाहनांची वर्दळ तसेच पाल्यांच्या पालकांकडून रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत होते़ त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती़ दरम्यान वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू असतानाच एका महिला पोलीस कर्मचा-याच्या पतीनेच पोलिसांशी वाद घातल्याची घटना घडली़

वडाळा-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या केंब्रिज शाळा भरताना व सुटताना वाहतुकीची मोठी कोंडी होते़ या शाळेच्या आवारात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होणे अपेक्षित असताना रहदारीचा रस्त्याच वाहनतळ झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता़ शाळा सुटणे व भरण्याच्या वेळी अनेक लहान- मोठे अपघातही नियमितपणे होत असून विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणेही मुश्किल होते़ त्यामुळे सोमवारी सकाळी वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, शंकर दातीर यांचेसह वाहतुक शाखेच्या पोलिसांनी याठिकाणच्या बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई केली़

वाहतूक पोलिसांनी शाळेसमोरील रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या असलेल्या वाहनधारकांवर कारवाई सुरु झाल्याने अनेकांनी पोलिसांशी वादविवाद केला़ त्यामध्ये एका महिला पोलीस कर्मचा-याच्या पतीनेही पोलीसांशी वाद घातल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक भाले यांनी याबाबत नोंद केली आहे़ दरम्यान, पोलिसांचे नातेवाईकच वाद घालत असतील तर केवळ सामान्यांसाठीच नियम का अशी चर्चा यावेळी होती़ यावेळी सुमारे तीस बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली़

केंम्ब्रिज शाळेसमोरच्या रस्त्यावरील वाहनतळ हे लवकरात लवकर शाळेच्या आवारात जाणे गरजेचे असून रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने लावणा-यांवर दंडात्मक तसेच आवश्यकता भासल्यास वाहनजप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे भाले यांनी सांगितले.महिला पोलीस कर्मचा-याची दबंगगिरीप्रिती कातकाडे या पोलीस मुख्यालयात शिपाई पदावर कार्यरत असून त्यांचे पती नितिन कातकाडे यांचे दुचाकी वाहन वाहतूक पोलिसांनी अडविले तेव्हा त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला़ यानंतर कातकाडे यांनी पोलीस मुख्यालयातील पत्नीला फोन लावला पोलीस अधिका-यासोबत बोलणे करून दिल्यानंतर त्यांचे वाहन सोडण्यात आले़ त्यामुळे सामान्य नागरिकांना व पोलीस कर्मचाºयांच्या नातेवाईकांसाठी वेगळा न्याय दुजाभाव का? असा प्रश्न नागरिक विचारत होते़

टॅग्स :Nashikनाशिकtraffic policeवाहतूक पोलीसCrimeगुन्हा