शेळीला मारणाºया वृद्धास सश्रम कारावास...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 22:49 IST2017-09-16T22:48:36+5:302017-09-16T22:49:51+5:30

शेळीला मारणाºया वृद्धास सश्रम कारावास...
नाशिक : घरातील बकरी व पत्नीस लाकडी फळीने जबर मारहाण करून त्यांच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी सुधाकर आनंदा साळवे (६५, राक़ोळवाडा, गुळवे गल्ली, खालचे चुंचाळे, अंबड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पांडे यांनी भादंवि कलम ४२९ मध्ये दोषी धरून शनिवारी (दि़१६) एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़
या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, १८ सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अंबड पोलीस ठाणे हद्दीत चुंचाळे शिवारातील कोळीवाडा येथील आरोपी सुधाकर साळवे याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पत्नी लीलाबाई साळवे (६०) व घरातील बकरीस जबर मारहाण केली़ यामध्ये लीलाबाई बेशुद्ध पडल्याने त्यांचा मुलगा किरण याने आईला जनसेवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ त्यामुळे अंबड पोलिसांनी सुधाकर साळवे विरोधात पत्नीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, खुनाचा गुन्हा दाखल केला होता, तर बकरीचाही मृत्यू झाल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता ४२९ (कोणताही हत्ती, उंट, घोडा इत्यादी मग ५० रुपये किंवा अधिक किमतीचे अन्य कोणतेही जनावर यास ठार मारून त्याच्यावर विषप्रयोग करून त्याला विकलांग करून निरुपयोगी करून आगळिक करणे) गुन्हा दाखल करून अटक केली होती़
न्याायाधीश पांडे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वडील दीपशिखा भिडे - भांड यांनी आठ साक्षीदार तपासले़ त्यामध्ये आरोपी सुधाकर साळवे यास भादंवि कलम ४२९ अन्वये विरोधात दोषी धरून एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले यांनी केला होता़