आजीशी भांडल्याच्या कारणावरून भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:58 IST2017-09-03T21:56:01+5:302017-09-03T21:58:16+5:30

nashik,ganjmal,brother,murder | आजीशी भांडल्याच्या कारणावरून भावाचा खून

आजीशी भांडल्याच्या कारणावरून भावाचा खून

ठळक मुद्दे भद्रकाली परिसरातील गंजमाळ येथील घटनाभद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

नाशिक : आजीशी भांडल्याच्या कारणावरून मोठ्या भावाचा लहान भावाने चाकूने वार करून खून केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास भद्रकाली परिसरातील गंजमाळ येथील श्रमिकनगरमध्ये घडली़ शिवराम बालाजी एखंडे (वय २२, श्रमिकनगर) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित सागर बालाजी एखंडे (वय १९, रा. श्रमिकनगर, गंजमाळ) यास अटक करण्यात आली आहे़
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सागर आणि त्याच्या आजीमध्ये वाद सुरू होता़ घरातील वादाचे प्रसंग नेहमीचेच असल्याने शिवरामने सागरला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त सागरने घरातील बाथरूमजवळ पडलेला चाकू उचलला आणि शिवरामच्या पोटावर वार केला. त्यात गंभीर जखमी झालेला शिवराम खाली कोसळताच घरातील मनोज किसन गायखे (वय ५०, श्रमिकनगर, गंजमाळ) या सागरच्या मामाने अडवण्याचा प्रयत्न केला असता तोही जखमी झाला. सागरच्या चाकू हल्ल्यात जखमी दोघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता शिवरामचा मृत्यू झाला.
या प्रकरणी रफिक किसन गायखे (वय ५०, श्रमिकनगर, गंजमाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे़ या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, कौटुंबिक वादातून हा खून झाल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ यांनी दिली़

Web Title: nashik,ganjmal,brother,murder