चार हजार बालकांना लाभले आधार कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 19:18 IST2019-11-17T19:17:24+5:302019-11-17T19:18:29+5:30

नाशिक : रस्त्यांवर तसेच गंगाघाटावर राहणाऱ्या वंचित बालकांना आधार कार्ड मिळवून देण्याबरोबरच त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कार्य करणाºया ...

nashik,four,thousand,children,receiveda,adhaar,card | चार हजार बालकांना लाभले आधार कार्ड

चार हजार बालकांना लाभले आधार कार्ड

ठळक मुद्देसेव्ह द चिल्ड्रन : गंगाघाटावरील वंचित बालकांनाही लाभ

नाशिक : रस्त्यांवर तसेच गंगाघाटावर राहणाऱ्या वंचित बालकांना आधार कार्ड मिळवून देण्याबरोबरच त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कार्य करणाºया ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या संस्थेने जवळपास चार हजार बालकांचे आधार कार्ड काढून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी हातभार लावला आहे. आधार कार्ड नसलेल्या मुलांना शोधून त्यांना त्यासाठी मदत करण्याबरोबरच त्यांना अन्य सुविधादेखील पुरविण्यात आल्या आहेत.
सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या माध्यमातून शहरातील शासकीय व सामाजिक संस्थांचे पुनरावलोकन व समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी याबाबतची माहिती देण्यात आली. महापालिका हद्दीतील झोपडपट्टी तसेच रस्त्यावर राहणाºया बालकांना कायदेशीर ओळख देण्याबरोबरच शासनाच्या अनेक योजनांचा लाभ तसेच शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या संस्थेकडून केले जाते. या कामाचा आढावादेखील बैठकीत घेण्यात आला.
बालकांना कायदेशीर ओळख मिळवून देण्याकरिता तसेच शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून पुनर्वसन करणेकामी, शासनाच्या विविध सामाजिक व आर्थिक योजनांचा व सेवांचा प्रत्यक्षरीत्या लाभ देण्याचे ध्येय आहे. आॅक्टोबर २०१९ अखेरपर्यंत नाशिक शहरात विविध ठिकाणी प्रत्यक्ष आधार केंद्रावर जाऊन व शिबिराच्या माध्यमातून एकूण ४११२ बालकांचे आधार कार्ड काढण्याचे तसेच २८७३ बालकांना विविध सामाजिक व आर्थिक सुरक्षा योजनांशी जोडण्याचे कार्य करण्यात आले आहे.

Web Title: nashik,four,thousand,children,receiveda,adhaar,card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.