शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठीच्या पाच जनावरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 17:38 IST

नाशिक :  कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच जनावरांची इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी (दि़२०) सकाळी सुटका केली़ जनावरांची चोरटी वाहतूक करणाºया एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़

ठळक मुद्देदोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्ततीन गाई व दोन गो-हे

नाशिक :  कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच जनावरांची इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी (दि़२०) सकाळी सुटका केली़ जनावरांची चोरटी वाहतूक करणा-या एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़

इंदिरानगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रोहित शिंदे यांना वडाळागावातील मांगीरबाबा चौकातून कत्तलीसाठी जनावरे नेणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास लोंढे यांना माहिती दिल्यानंतर सकाळी सात वाजेपासून मांगीरबाबा चौकात पोलीस कर्मचारी सानप, शेख, शिरसाट, सोनार यांनी सापळा रचला़ पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार संशयित छोटा हत्ती टेम्पोचालक (एमएच ०३, एएन ४०७५) संशयित आरोपी सद्दाम अन्वर पाटकरी (२६, रा. भद्रकाली) याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली़

पोलिसांनी या टेम्पोचे शटर उघडले असता त्यामध्ये जिवंत तीन गाई व दोन गो-हे आढळून आले़ पोलिसांनी संशयित पाटकरीची चौकशी केली असता त्याने छोटू कुरेशी आणि राजा कुरेशी यांच्या सांगण्यावरून ही वाहतूक केल्याचे सांगितले़ पोलिसांनी जनावरे व टेम्पो असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संशयितांवर गुन्हा दाखल केला आह़े

टॅग्स :NashikनाशिकcowगायPoliceपोलिसCrimeगुन्हा