शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

नाशिककरांना जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 3:24 PM

दिलासा : गंगापूर धरणात ३६ टक्के पाणीसाठा

ठळक मुद्देमहापालिकेकडून सद्यस्थितीत धरणातून प्रतिदिन ३९५ दसलक्षलिटर्स पाण्याची उचलभारतीय हवामान खात्याने मान्सूनचे वेळेत आगमन होऊन सरासरी पावसाचा अंदाज वर्तविल्याने जुलैमध्येच धरणांत पाणी येण्यास सुरुवात होण्याची शक्यता

नाशिक - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व दारणा धरणात ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असून गंगापूर धरण समुहातील काश्यपी धरणातही पुरेसा पाणीसाठा असल्याने नाशिककरांना पाण्याची चिंता भेडसावणार नाही. गंगापूर धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर महापालिकेकडून सद्यस्थितीत धरणातून प्रतिदिन ३९५ दसलक्षलिटर्स पाण्याची उचल केली जात आहे. यंदा, भारतीय हवामान खात्याने मान्सूनचे वेळेत आगमन होऊन सरासरी पावसाचा अंदाज वर्तविल्याने जुलैमध्येच धरणांत पाणी येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.नाशिक शहराला गंगापूर आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणातील ३९०० द.ल.घ.फू. तर दारणा धरणातील ४०० द.ल.घ.फू. पाणी आरक्षित आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरणात २०३१ दलघफू म्हणजे ३६ टक्के पाणीसाठा आहे तर दारणा धरणात ३०६७ दलघफू म्हणजे ४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेकडून गंगापूर धरणातून प्रतिदिन ३९५ दसलक्षलिटर्स तर दारणातून प्रतिदिन ४५ दसलक्षलिटर्स याप्रमाणे एकूण ४४० दसलक्षलिटर्स पाण्याची उचल केली जात आहे. शहराची पाण्याची गरज लक्षात घेता ३१ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा दोन्ही धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे, नाशिककरांना अडीच ते तीन महिने पाण्याची चिंता भेडसावणार नसल्याचा दावा मनपाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत केला जात आहे. गंगापूर धरण समुहातील काश्यपी धरणात सद्यस्थितीत १६४५ द.ल.घ.फू. म्हणजे ८९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. काश्यपी धरणातील पाणी हळूहळू गंगापूर धरणात आणले जात आहे. त्यामुळे, पाण्याचा अतिरिक्त साठा शिल्लक आहे. गौतमी गोदावरी व आळंदीतील पाणीसाठा आता आटला आहे. गंगापूर धरणातील आरक्षित पाण्याची पूर्ण उचल महापालिकेकडून होणार आहे. दरम्यान, यंदा हवामान खात्याने मान्सून वेळेवर सक्रीय होण्याचा आणि सरासरी इतके पाऊसमान वर्तविल्याने जुलैमध्येच धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDamधरण