nashik,during,the,lockdown,profitability,declines | लॉकडाऊनच्या काळात नफेखोरीला उत

लॉकडाऊनच्या काळात नफेखोरीला उत

ठळक मुद्देग्राहकांमध्ये तीव्र नाराजी :जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री

नाशिक: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने काही संधीसाधू दुकानदारांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवून अडचणीत सापडलेल्या ग्राहकांची आर्थिक लूट करीत नफेखोरीचा धंदा सुरू केला आहे. शहरातील काही व्यावसायिक चढ्या भावाने किराणामालाची विक्री करीत असताना अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मात्र या काळया बाजाराकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्राहकाची फसवणूक करणारे व्यापारी निरढावले आहेत.
दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी करताना आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकरून होत आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांकडे पर्याय उपलब्ध नसल्याने मिळेल त्या भावात ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी लागत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतभर घोषित केलेल्या  लॉक डाऊनलोड अनिश्चित असल्याने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंचा दोन तीन महिन्याचा  साठा करण्यावर भर दिला आहे. शासनाकडून जीवनावश्­यक वस्तूंची दुकाने उघडे राहतील असे सांगितले जात असले तरी कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह सिडको, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, जेलरोड, आडगाव, मखमलाबाद परिसरात असाप्रकार समोर येत असून त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
किरणामालात प्रती किलो १० ते २० रुपये नफा कमाविण्यासाठी दुकादारांकडून प्रयत्न होत असल्याने ग्राहकांची मोठया प्रमाणात लूट होत असून लॉक डाऊनच्या काळात नोकरी-व्यवसाय बंद असल्याने नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.अशा संधीसाधू विक्रेत्यांवर प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

Web Title: nashik,during,the,lockdown,profitability,declines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.