मागणी नसल्याने वीजनिर्मितीही घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:41 IST2019-11-01T15:40:21+5:302019-11-01T15:41:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क एकलहरे: राज्यात ठिकठिकाणी बंद पडलेले उद्योग, सर्वदूर पडत असलेला मुसळधार पाऊस, शेतात पाणी साचल्याने शेतपंपासाठी थांबलेला ...

मागणी नसल्याने वीजनिर्मितीही घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
एकलहरे: राज्यात ठिकठिकाणी बंद पडलेले उद्योग, सर्वदूर पडत असलेला मुसळधार पाऊस, शेतात पाणी साचल्याने शेतपंपासाठी थांबलेला वीजेचा वापर यामुळे वीजेची मागणी कमी झाल्याने राज्यातील महानिर्मिती चे संच काही ठिकाणी पूर्णपणे बंद तर काही ठिकाणी अंशत: वीज निर्मिती सुरु आहे. नाशिकचे एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्रही त्याला अपवाद नाही.
एकलहरे येथील प्रत्येकी २१० मेगावाट वीज निर्मिती क्षमता असलेल्या संच क्र मांक तीन, चार व पाचपैकी सद्या फक्त संच क्र मांक पाच मधून वीज निर्मिती सुरु आहे. वीजेची मागणी वाढल्यास टप्प्या टप्प्याने संच तीन व चार सुरु करण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली. एकलहरे प्रमाणेच राज्यातील महानिर्मितीच्या वीज केंद्रातून क्षमतेपेक्षा अत्यंत कमी वीज निर्मिती होत आहे. पारस आणि परळीचे संच पूर्णपणे बंद आहेत. नाशिक, कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, भुसावळ येथील औष्णिक निर्मिती संथ गतीने सुरु आहे. तर उरण गॅस टर्बाईनची वीज निर्मितीही निम्म्यावर आली आहे. पावसामुळे हायड्रो पॉवर स्टेशन्सची वीजनिर्मिती बऱ्यापैकी सुरु आहे. पावसाळी व ढगाळ वातावरणामुळे साक्र ी व सिरसुफळची सोलर वीज निर्मिती जेमतेमच आहे.
एकिकडे सरकारी मालकीच्या महानिर्मितीच्या कोल, गँस, हायड्रो व सोलर मिळून वीज निर्मिती ४१९३ मेगावाटच्या जवळपास आहे, तर दुसरीकडे खाजगी क्षेत्रातील जिंदाल, अदानी, रतन इंडिया, धारीवाल व इतर यांची वीज निर्मिती ४५०७ मेगावँटच्या जवळपास आहे.