महिलांसाठी सायकलिंग राईडस्;दिडशे महिलांची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 17:04 IST2019-04-03T17:03:09+5:302019-04-03T17:04:13+5:30
नाशिक : महिलांना सायकलिंगसाठी प्रोत्साहित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘वूमन्स आॅन व्हील्स राईड’ या उपक्रमांतर्गत सुमारे दिडशे महिलांची सायकल रॅली ...

महिलांसाठी सायकलिंग राईडस्;दिडशे महिलांची सायकल रॅली
नाशिक: महिलांना सायकलिंगसाठी प्रोत्साहित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘वूमन्स आॅन व्हील्स राईड’ या उपक्रमांतर्गत सुमारे दिडशे महिलांची सायकल रॅली उत्साहाता पार पडली.
टीमथ्री यांच्यावतीने गेल्या रविवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रिडा अधिकारी रविंद्र नाईक, फायरफॉक्सचे राज लुथरा, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शैलजा जैन, डॉ. रत्ना अष्टेकर, यामिनी खैरनार, सचिन मोरे यावेळी उपस्थित होते. जूना गंगापूर नाका येथून रॅलीला प्रारंभ झाला. सोमेश्वेर, गंगापूर, गम्मत जम्मत आणि परतीला त्याच मार्गाने रॅलीचा समारोप करण्यात आला.
या रॅलीमध्ये सुमारे दिडशे महिलांसह १५ वर्षाखालील मुलांचा देखील सहभाग होता. २० किलोमीटरपेक्षा कमी अंतराची ही स्पर्धा असून केवळ महिलांना रायडींगसाठी संदेश देणे हा यामगचा उद्देश असल्याचे प्रकल्प प्रमुख डॉ. सारीका देवरे यांनी सांगितले. दरम्यान, येत्या २८ एप्रिल रोजी होणाऱ्या रॅलीमध्ये महिलांनी सहभागी व्हावे असे अवाहन टीम थ्रीडीचे धीरज छाजेड, गणेश पाटील, विकास जैन आणि राज लुथरा यांनी केले. सदर स्पर्धा नि:शुल्क असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.