nashik,chief,minister,announces,drought-free,maharashtra | मुख्यमंत्र्यांची दुष्काळमुक्त महाराष्ट्रची घोषणा
मुख्यमंत्र्यांची दुष्काळमुक्त महाराष्ट्रची घोषणा


नाशिक: महाराष्ट्रतील गावे दुष्काळमुक्त करण्याचे काम आगामी पाच वर्षात हाती घेणार असल्याची घोषणा करीत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या तपोवन येथे महाजनादेश यात्रेच्या समारोप सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. महाराष्ट्रचे पाणी मराठवाड्याला नेण्यासाठीच्या योजना करणार असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रतील पाण्याचा प्रश्न सोडविण्याबरोबरच नारपार प्रकल्प, दमणगंगा माध्यमातून दुष्काळावर मात करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रला प्रगतीपथावर नेण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असल्याचे सांगून यापुढेही जनेतकडून आशिर्वादाची अपेक्षा असल्याचे सांगितले.

 


Web Title: nashik,chief,minister,announces,drought-free,maharashtra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.