१०५० उमेदवारांचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 16:25 IST2019-02-21T16:24:53+5:302019-02-21T16:25:22+5:30

नाशिक : अनेक कारणांमुळे आदिवासी विभागाच्या भरतीप्रक्रियेपासून वंचित राहणाऱ्या रोजंदारीवरील कर्मचाºयांना अर्ज दाखल करण्याची संधी मिळाल्यानंतर राज्यातील सुमारे १०५० ...

nashik,candidates,file,nominations | १०५० उमेदवारांचे अर्ज दाखल

१०५० उमेदवारांचे अर्ज दाखल

ठळक मुद्दे२४ रोजी परीक्षा : आंदोलनामुळे रद्द परीक्षाही होणार


नाशिक: अनेक कारणांमुळे आदिवासी विभागाच्या भरतीप्रक्रियेपासून वंचित राहणाऱ्या रोजंदारीवरील कर्मचाºयांना अर्ज दाखल करण्याची संधी मिळाल्यानंतर राज्यातील सुमारे १०५० कर्मचाºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहे. या उमेदवारांची परीक्षा येत्या २४ रोजी होणार आहे. दरम्यान, गेल्या १६ रोजी रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांची परीक्षा देखील याच दिवशी होणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील शासकीय आश्रमशाळेत रोजंदारीवर काम करणाºया अनुसुचित जमातीमधील ज्या उमेदवारांना वयाची अट व कमी टक्केवारीमुळे आॅनलाईन अर्ज भरता आलेला नव्हता अशा उमेदवारांना विभागाकडून दोन दिवसांची विशेष मुदत देण्यात आली होती. दि. २० रोजी रात्यातील २९ प्रकल्पांवर अशा उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत देण्यात आली होती. २०१६ पूर्वी जे रोजंदारी पद्धतीने काम करत होते व ज्यांना अर्ज भरता आला नव्हता अशा उमेदवारांनी अर्ज सादर केले. सुमारे ६०० शिक्षक प्रवर्गातील रोजंदारी उमेदवारांनी अर्ज सादर केल्याचे समजते.
बिºहाड आंदोलन आणि तांत्रिक कारणामुळे डब्ल्यूएनएस आणि संदीप फाउंडेशन येथील रद्द झालेली १ हजार ४०० उमेदवारांची लेखी परीक्षा देखील याच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. या सर्व उमेदवारांना महाआॅनलाईनकडून मोबाईलवर संदेश पाठवून परीक्षा केंद्राचे स्थळ आणि वेळ कळविण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाकडून देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर आदिवासी विभागातील रोजंदारीवील कर्मचाºयांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना गुणदानात काही सवलत देण्यात आलेली आहे. या खुल्या भरतीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया मुलांबरोबर आदिवासी रोजंदारीवरील कर्मचारी स्पर्धा करू शकणार नाह असा मुद्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडल्यानंतर या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीच्या गुणदानात बदल करण्यात आला आहे. याचा दिलासा विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने उर्वरित मुलांनी परिक्षेसाठीच अर्ज दाखल केले असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.

Web Title: nashik,candidates,file,nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.