शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नाशिक परिमंडळाची थकबाकी १९१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 6:34 PM

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सुमारे १९१ कोटींची थकबाकी असल्याचे सांगून महावितरणने वीज बिल ...

ठळक मुद्देवसुलीची सक्ती : कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सुमारे १९१ कोटींची थकबाकी असल्याचे सांगून महावितरणने वीज बिल वसुलीसाठी कठोर भूमिका घेतली आहे. ग्राहकांसह कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याचे आदेश देत महिनाभरात वसुलीचे धोरण स्वीकारले आहे.महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाची घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील चालू थकबाकी ९४४ कोटींवर पोहचली असून, वीज बिल थकविलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यात आली आहे. ९० टक्क्यांपेक्षा कमी वसुली करणाºया अधिकाºयांवरदेखील शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत कोकण विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार कळम यांनी दिले आहेत.एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांतील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे ही ९४४ कोटींची चालू थकबाकी असून, यामुळे महावितरणच्या महसुलावर परिणाम होत आहे. कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाºया १२ जिल्ह्यांमध्ये कार्यरत अधिकाºयांच्या कामाचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेताना विजयकुमार काळम पाटील (भाप्रसे) यांनी हे आदेश दिले आहेत.वीज बिल थकीत ग्राहकांचा पुरवठा तोडल्यानंतर संबंधितांनी अनधिकृत वीजपुरवठा घेतला असल्यास अशा ग्राहकांविरु द्ध गुन्हा नोंद करण्याच्या स्पष्ट सूचनादेखील काळम यांनी दिल्या आहेत. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा सुरू न करण्याच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत. गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना विहित प्रक्रि येद्वारे तात्पुरती वीज जोडणी तत्काळ द्यावी. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव अधिकृत वीज जोडणी न घेणाºया मंडळांची यादी संबंधित पोलीस स्टेशनला द्यावी, असे आदेश यावेळी काळम पाटील यांनी दिले.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज