शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

नाशिककरांना जाणवतोय उन्हाचा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:50 AM

शहराचे कमाल-किमान तापमान वाढू लागले असून, वातावरणात उष्मा जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हाचा नाशिककरांना चटका बसत असून, शहरातील रस्ते दुपारपासून संध्याकाळपर्यंत ओस पडू लागले आहे.

नाशिक : शहराचे कमाल-किमान तापमान वाढू लागले असून, वातावरणात उष्मा जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हाचा नाशिककरांना चटका बसत असून, शहरातील रस्ते दुपारपासून संध्याकाळपर्यंत ओस पडू लागले आहे. बुधवारी (दि.२७) कमाल तापमानाचा पारा ३८.५ अंशांपर्यंत वर सरकल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.मार्चअखेर संपूर्ण राज्यात उष्मा वाढला असून, विदर्भासह उत्तर महाराष्टÑालाही उन्हाच्या तीव्रतेचा फटका बसत आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात बुधवारी नोंदविले गेले तर सर्वाधिक कमी तापमानाची नोंद अहमदनगरला झाली. नाशिक शहराचेही तापमान मार्चअखेर ३९ अंशांच्या पुढे सरकले होते. दोन दिवसांपूर्वी शहराचा पारा ३९.३ अंशांपर्यंत वाढला होता. किमान तापमानातही वाढ होत असून, १७.४ अंश इतके किमान तापमान बुधवारी नोंदविले गेले. यामुळे रात्रीदेखील नागरिकांना उष्म्याच्या त्रास जाणवत आहे. त्यामुळे कूलर, पंखे, वातानुकूलित यंत्राच्या वापरावर नागरिक भर देत आहेत. घरे, कार्यालयांमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत पंखे, वातानुकूलित यंत्रे चालविली जात आहे. असह्य वाटणाऱ्या झळांपासून बचाव करण्यासाठी शीतपेयांचा आधार घेतला जात आहे.वातावरणात वाढलेल्या उष्म्याने जिवाची काहिली होत असून, नागरिक थंड गुणधर्म असलेली फळे खाण्यास प्राधान्य देत आहे. यामुळे टरबूज, खरबूज, फणस, काकडी यांसारख्या फळांना मागणी वाढली आहे. हंगामी विक्रेत्यांची चलती असून, रस्तोरस्ती झाडांच्या सावलीला लिंबू पाणी, ऊस रसवंती गुºहाळ, फळविक्रेते मोसंबी, संत्र विक्रेते नजरेस पडत आहेत.

टॅग्स :TemperatureतापमानNashikनाशिक