शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

नाशिककरांना पावसाने दीड तास झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:30 IST

नाशिककरांना परतीच्या पावसाची महिनाभरापासून प्रतीक्षा होती. मंगळवारी (दि. १८) संध्याकाळी पाच वाजता परतीच्या पावसाचे ढग शहर व परिसरात दाटून आले अन् टपोऱ्या थेंबांच्या जोरदार सरींच्या वर्षावात नाशिककर पुन्हा चिंब झाले. दीड तासात शहरात ५३ मिमी इतक्या पावसाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयातील पर्जन्यमापक यंत्राद्वारे झाली.

ठळक मुद्दे५३ मि.मी. पाऊस : परतीच्या पावसाची जोरदार हजेरीचाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची तारांबळ

नाशिक : नाशिककरांना परतीच्या पावसाची महिनाभरापासून प्रतीक्षा होती. मंगळवारी (दि. १८) संध्याकाळी पाच वाजता परतीच्या पावसाचे ढग शहर व परिसरात दाटून आले अन् टपोऱ्या थेंबांच्या जोरदार सरींच्या वर्षावात नाशिककर पुन्हा चिंब झाले. दीड तासात शहरात ५३ मिमी इतक्या पावसाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयातील पर्जन्यमापक यंत्राद्वारे झाली.आठवडाभरापासून शहरात उन्हाचा तडाखा वाढला होता. त्यामुळे कमाल तपमानाचा पारा थेट ३० अंशांपर्यंत सरकला होता. वातावरण उष्ण बनल्याने परतीच्या पावसाची नाशिककर प्रतीक्षा करीत होते. अखेर मंगळवारी संध्याकाळी दीड तास जोरदार पाऊस झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला व नागरिकांनी आनंद व्यक्त केला. अचानक आलेल्या पावसाने संध्याकाळी शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या वेळी मुसळधार पाऊसधारा बरसू लागल्याने घरी परतणाºया विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. पावणेपाच वाजेपासून शहरात ढग दाटून येण्यास सुरुवात झाली आणि थंड वारा वाहू लागला होता. पाच वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे पावणेसात वाजेपर्यंत जोरदार पाऊस शहरासह उपनगरीय भागात झाला. अवघ्या पुढील दहा ते पंधरा मिनिटांत पावसाचा जोर कमालीचा वाढला.रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. महापालिकेच्या भुयारी गटार विभागाच्या तयारीचे पितळ परतीच्या पावसाने उघडे पाडले. जुने नाशिक, भद्रकाली, अशोकस्तंभ, घनकर गल्ली, वकिलवाडी, वडाळा आदी भागात गटारींचे सांडपाणी रस्त्यावर वाहतानाचे चित्र दिसले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. हवामान केंद्रात २७ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली.गणेशभक्तांची गर्दी ओसरलीगणेशोत्सव साजरा होत असताना सहाव्या दिवशी वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संध्याकाळी देखावे बघण्यासाठी होणाºया गर्दीवरदेखील परिणाम झाला. साडेसहा वाजेपर्यंत पाऊस सुरू असल्याने काही मंडळांनी देखावे रात्री उशिरा खुले केले. वीजपुरवठा खंडित झाला असल्याने गणेशोत्सव देखावे खुले होऊ शकले नव्हते. दरम्यान, पंचवटी, जुने नाशिक, रविवार कारंजा परिसर, सराफ बाजार, भद्रकाली या भागातील भुयारी गटारींचे सांडपाणी रस्त्यावर वाहू लागल्याने परिसरातील गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली.जिल्ह्याला परतीच्या पावसाची ओढशेतकºयांना परतीच्या पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. खरिपाच्या पिकांवर संकट आले असून, राज्यभरात पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. नाशिक तालुक्यासह दिंडोरी, बागलाण, कळवण, सिन्नर तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य तालुक्यांत मंगळवारचा पाऊस झाला नाही. परतीच्या पावसाकडे शेतकºयांचे डोळे लागले आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक