नाशकात तरुणांनी घेतला प्राणवायू संजीवनीसाठी पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:13 IST2021-04-18T04:13:59+5:302021-04-18T04:13:59+5:30
पंचवटीतील तरुणंनी एकत्र येत संघटन करून, ‘युवराज श्रीमंत संभाजीराजे छत्रपती वैद्यकीय मदत’ केंद्राची स्थापना केली असून, या मदत केंद्राच्या ...

नाशकात तरुणांनी घेतला प्राणवायू संजीवनीसाठी पुढाकार
पंचवटीतील तरुणंनी एकत्र येत संघटन करून, ‘युवराज श्रीमंत संभाजीराजे छत्रपती वैद्यकीय मदत’ केंद्राची स्थापना केली असून, या मदत केंद्राच्या माध्यमातून शहरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड मिळत नसलेल्या आणि ऑक्सिजनची नितांत गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन किट पुरविले जाणार आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची भयावह स्थिती आहे. वाढत असलेली रुग्णसंख्या आणि उपलब्ध आरोग्य सुविधा यांचे व्यस्त प्रमाण, यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आल्याने रुग्णांना दाखल करून घेणे अवघड बनले आहे. कुठल्याही रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने अनेक रुग्णांना घरात, हॉस्पिटलबाहेर, रस्त्यावर रुग्णवाहिकेत उपचार घेण्याची वेळ आली आहे. त्यातच ऑक्सिजनच्या प्रचंड तुटवड्यामुळे गरजवंत रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने, प्राणाला मुकावे लागत आहे, अशा गरजवंत रुग्णांना या वैद्यकीय मदत केंद्रामार्फत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड मिळेपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा विनाशुल्क करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, शिवजन्मोत्सव समिती विविध मराठा संघटनांनी एकत्र येत मदत केंद्राची स्थापना केली आहे. या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून घरपोच ऑक्सिजन सेवा नाशिककरांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे, या उपक्रमात तुषार जगतार यांच्यासह मामा राजवाडे, सतनाम राजपूत, उल्हास धनवटे, दिगंबर मोगरे, सचिन पवार, विलास जाधव, किरण पाणकर, नीलेश मोरे, संतोष माळोदे, सुरेश सोलंकी अमित नडगे, सचिन शिंदे, हर्षद पवार, हार्दिक निगळ, संतोष पेलमहाले, सुनील निर्गुडे, राजेंद्र वागले यांच्यासह शेकडो तरुण या आरोग्य यज्ञात सहभागी झाले आहेत.
===Photopath===
170421\17nsk_23_17042021_13.jpg
===Caption===
कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी तूषार जगतार यांच्यासह मामा राजवाडे, सतनाम राजपूत, उल्हास धनवटे, दिगंबर मोगरे, सचिन पवार, विलास जाधव, किरण पाणकर, निलेश मोरे आदी