नाशिक : जिल्ह्याच्या वनविभागात बदल्यांच्या हालचाली गतिमान झाल्याचे चित्र आहे. महसूल खात्यात शासनाकडून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर आता वनविभागाच्यादेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही लवकरच होणार असल्याने नाशिक वनवृत्ताला मुख्य वनसंरक्षक लवकरच लाभण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या हा पदभार वन्यजीव विभागाच्या वनसंरक्षकांकडे अतिरिक्त म्हणून सोपविण्यात आलेला आहे.नाशिक प्रादेशिक वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके हे ३० आॅक्टोबर २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून आजतागायत या पदाचा कार्यभार वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्याकडे प्रभारी म्हणून सोपविला गेला आहे. शासनदरबारातील विविध कारणास्तव अद्याप नाशिक वनवृत्ताच्या प्रादेशिक विभागाच्या मुख्य वनसंरक्षकपदी स्वतंत्रपणे अधिका-यांची नियुक्ती होऊ शकलेली नाही. पुढील तीन महिन्यांनी या रिक्त जागेला एक वर्षाचा कालावधी पुर्ण होऊ शकतो. महसूलपाठोपाठ वनखात्यातसुध्दा वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्यांच्या हालचालींना वेग आल्याने या रिक्त पदावर लवकरच नवीन अधिका-यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्य वनसंरक्षक या पदासाठी मंत्रालयातील वन-महसुल विभागातील काही अधिकाºयांची नावे वनविभागाच्या कार्यालयाच्या वर्तुळात सध्या चर्चेत आहेत.तसेच अंतर्गत बदल्यांसाठी वनपाल, वनरक्षकांकडूनही आपापल्या उपवनसंरक्षकांकडे अर्ज करण्यात आले आहेत. एकूणच नाशिक वनविभागात आता बदल्यांचे वारे वाहू लागले आहे.‘पश्चिम’ला मिळणार नवीन उपवनसंरक्षकनाशिक पश्चिम विभागाच्या उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांची बदली झाल्यानंतर त्या पदाचा कार्यभार शिवाजी फुले यांच्याकडे सोपविला गेला. त्यांनी जवळपास सहा ते आठ महिन्यांचा कालावधी या पदावर पुर्ण केला आहे. फुले यांना लवकर पदोन्नतीने बदलून जावे लागू शकते. त्यामुळे या विभागाला नवीन उपवनसंरक्षक मिळण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
नाशिकला लवकरच लाभणार मुख्य वनसंरक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 18:26 IST
महसूलपाठोपाठ वनखात्यातसुध्दा वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्यांच्या हालचालींना वेग आल्याने या रिक्त पदावर लवकरच नवीन अधिका-यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाशिकला लवकरच लाभणार मुख्य वनसंरक्षक
ठळक मुद्देमहसूलपाठोपाठ वनखात्यातही वेग‘पश्चिम’ला मिळणार नवीन उपवनसंरक्षक