शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटाजवळ भीषण अपघात, दोन महिलांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 14:55 IST

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटाजवळ सोमवारी (20 ऑगस्ट) सकाळी भीषण अपघात झाला.

- शाम धुमाळ कसारा -  मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटाजवळ सोमवारी (20 ऑगस्ट) सकाळी भीषण अपघात झाला. लतिफवाडी गावाजवळ एका भरधाव टँकरने रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या कारला धडक देऊन पिक-अप बोलेरो गाडीवर आदळला. या भीषण आपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही महिला रस्त्याशेजारी उभ्या राहून चहा पित होत्या. या दोघींनाही धडक देऊन भरधाव टँकरनं त्यांना 50 फूट अंतरावर फरफटत नेले. हा अपघात इतका भीषण होता की,महिलांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले. दरम्यान, जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मुंबईहून नाशिककडे निघालेल्या कारमधील (क्रमांक MH 02 EP 9119) मंडळी लतिफवाडीजवळ एका ढाब्यावर चहापाणी घेण्यासाठी थांबली असता भरधाव येणाऱ्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला व टँकरची कार व बोलेरो गाडीला धडक बसली.   

मदतीसाठी धावले देवदूत दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन गृपचे सदस्य, पिक इन्फ्रा पेट्रोलिंगचे सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. या मदत कार्यामुळे तीन जणांवर वेळीचे उपचार करणे शक्य झाले. या घटनेची माहिती मिळताच कसारा पोलीस व महामार्गावरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंदण जाधव, पी.एस.आय डगळे पुढील तपास करत आहेत.  

अपघाती क्षेत्राकडे ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष दरम्यान कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेला लतिफवाडी परिसर हा अपघाती क्षेत्र असून या ठिकाणी वर्षभरात आतापर्यंत आठ बळी  गेले आहेत. तर 50हून अधिक जखमी झाले आहेत. या क्षेत्रात रस्त्यांवर पांढरे पट्टे तसेच स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी अनेकदा तक्रारी करुन देखील पिक इन्फ्राचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिरुद्ध सिंग तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNashikनाशिक