शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये तोतया विज कर्मचा-यांनी केली दोन लाखांच्या दागिण्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 19:33 IST

नाशिक : तुम्ही लाईटबील भरलेले नाही, बिल दाखवा ,घरातील लाईटचे पॉर्इंट दाखवा अशी विचारणा करून घरात घुसलेल्या दोन तोतया वीज मंडळ कर्मचा-यांनी वृद्ध महिलेच्या पावणेदोन लाख रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारी नाशिकरोडच्या विद्याविहार कॉलनीत घडली़ विशेष म्हणजे अशा प्रकारे घरात घुसून चोरी केल्याची ही शहरातील तिसरी घटना आहे़

ठळक मुद्दे नागरिकांमध्ये धास्ती : वृद्ध महिला टारगेटदोन दिवसात तीन घटना ; उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : तुम्ही लाईटबील भरलेले नाही, बिल दाखवा ,घरातील लाईटचे पॉर्इंट दाखवा अशी विचारणा करून घरात घुसलेल्या दोन तोतया वीज मंडळ कर्मचा-यांनी वृद्ध महिलेच्या पावणेदोन लाख रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारी नाशिकरोडच्या विद्याविहार कॉलनीत घडली़ विशेष म्हणजे अशा प्रकारे घरात घुसून चोरी केल्याची ही शहरातील तिसरी घटना आहे़

उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्याविहार कॉलनी, गुरुद्वाराच्या पाठिमागे अलका नारायण धिवरे (७५) यांचा अरुण विहार बंगला आहे़ शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धिवरे या घरी एकट्याच होत्या़ त्यावेळी ३५ ते ४० वयोगटातील दोन अनोळखी पुरूष घरी आले व त्यांनी एमएसईबीचे कर्मचारी असल्याची बतावणी करून तुम्ही बिल भरलेले नाही़ तुम्ही भरलेल्या बिलाची पावती दाखवा, तसेच हातातील बांगड्या काढून ठेवा असे सांगितले़ यानंतर धिवरे यांनी त्यांच्या हातातील १ लाख ७७ हजार रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या काढून त्या कपाटातील पर्समध्ये ठेवल्या होत्या़

तोतया एमएसईबी कर्मचा-यांपैकी एकजण घरातील लाईटचे पॉर्इंट दाखविण्याच्या नावाखाली वृद्ध महिला धिवरे यांना घराच्या गच्चीवर घेऊन गेला तर खाली असलेल्या दुसºया तोतया कर्मचाºयाने कपाटातील पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या़या प्रकरणी धिवरे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात या दोघा तोतयांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन दिवसात तीन घटनापंचवटीतील भक्तीधामजवळील तुलसी श्याम अपार्टमेंट येथील जयश्री दिलीप जोशी (६०) यांच्या घरी गुरुवारी (दि़ १५) दुपारी दोन संशयित मीटर रिडींग घेण्याच्या बहाण्याने घरी गेले़ या ठिकाणी लाईटचे पॉर्इंट पाहण्याच्या बहाण्याने जोशी यांचे ५० हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ तर सकाळच्या सुमारास दिंडोरी रोडवरील अमृतकुंभ सोसायटीत राहणा-या नव्वद वर्षीय महिलेस जनगणनेच्या कामासाठी आल्याचे सांगून दोन संशयितांनी घरातील पाऊण लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ तर उपनगरची धिवरे यांची या प्रकारची तोतया एमएसईबी कर्मचा-यांनी फसवणूक केल्याची ही तिसरी घटना आहे़

टॅग्स :NashikनाशिकEmployeeकर्मचारीPoliceपोलिसCrimeगुन्हा