नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या

By Admin | Updated: May 31, 2017 10:00 IST2017-05-31T10:00:08+5:302017-05-31T10:00:08+5:30

नाशिकमधील कोकणगाव येथे मंगळवारी (30 मे) मध्यरात्री एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nashik: Three deadly murders of a single family in Nashik | नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या

नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या

>ऑनलाइन लोकमत
दिंडोरी (नाशिक), दि. 31  - नाशिकमधील कोकणगाव येथे मंगळवारी (30 मे) मध्यरात्री एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  
 
एक दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा अशा एकाच  कुटुंबातील तीन जणांची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. जगन मुरलीधर शेळके, शोभा जगन शेळके आणि हर्षद जगन शेळके अशी मृतांची नावं आहेत. 
 
दरम्यान, या तिघांची हत्या करण्यामागील कारणं अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. तसंच घटनास्थळ आणि आसपास परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
 वणी पोलीस व नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तपासकार्य सुरू आहे.

Web Title: Nashik: Three deadly murders of a single family in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.