नाशिक : तिकडे कॉनलीन भागातील हॉटेल राजभोग समोरून एका चारचाकी कारच्या काचा तोडून कारमध्ये ठेवलेला लॅपटॉप मोबाईलसह अन्य साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात मुबंई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, विवेक श्रीधर हरणे (४०,रा.पर्पल ब्लू सोसायटी, साईपार्क, दिघी पुणे) यांनी तिडको कॉलनी परिसरातील राजभोग हॉटेलसमोर त्यांची उभी केलेली असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्य काडीची काच फोडून गाडीच ठेवेलेल्या लॅपटॉप व मोबाईलसह हेडफोन,स्मार्टवॉच पावर बँक व चार्जर असा एकूण ८४ हजार ५०० रुपयांचे साहित्य चोरून नेले.ही घटना विवेक हरणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ मुंबई नाका पोलिस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सहायक पोलीस उपनिरीक्षक केशव आडके पुढील तपास करीत आहेत.
नाशिक: कारची काच फोडून लॅपटॉप, मोबाईलची चोरी
By नामदेव भोर | Updated: March 23, 2023 14:11 IST