नाशिक स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी, सुमंत मोरे यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 13:42 IST2021-07-02T13:41:22+5:302021-07-02T13:42:21+5:30

पाच वर्षांपूर्वी त्यांची नियुक्ती झाली होती. मात्र त्यांचा कारभार अत्यंत मनमानी असल्याचा नगरसेवकांचा आरोप होता.

Nashik Smart City CEO Prakash Thavil finally transfered, Sumant More new CEO | नाशिक स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी, सुमंत मोरे यांची नियुक्ती

नाशिक स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी, सुमंत मोरे यांची नियुक्ती

नाशिक : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे वादग्रस्त सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी सुमंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आता मुख्य सचिव आणि कम्पनीचे अध्यक्ष  सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत कंपनीच्या सभागृहात बैठक सुरू आहे त्याच वेळी हे आदेश धडकले आहेत.
पाच वर्षांपूर्वी त्यांची नियुक्ती झाली होती. मात्र त्यांचा कारभार अत्यंत मनमानी असल्याचा नगरसेवकांचा आरोप होता. गेल्या 29 जून रोजी स्मार्ट सीटी याच विषयावर नाशिक महापालिकेची विशेष महासभा झाली होती. त्यावेळी कम्पनीच्या आणि विशेषतः प्रकाश थविल यांच्यावर जोरदार टीका झाली होती. स्मार्ट सीटी कंपनीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे थविल यांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर थविल यांनी मुंबईत जाऊन कुंटे यांच्याकडे सफाई देखील दिली होती.

Web Title: Nashik Smart City CEO Prakash Thavil finally transfered, Sumant More new CEO

टॅग्स :Nashikनाशिक