Nashik: मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या उद्धव सेनेची तलवार म्यान

By संजय पाठक | Updated: March 23, 2025 18:45 IST2025-03-23T18:37:34+5:302025-03-23T18:45:20+5:30

Nashik News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा उध्दव सेनेने दिला खरा, मात्र पोलीसांनी कावाईचा इशारा देताच तलवार मान्य करण्यात आली आणि फडणवीस यांचीच भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. त्यामुळे उध्दव सेनेतच हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Nashik: Shiv Sena's UBT sword sheathed, warning CM to show black flags | Nashik: मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या उद्धव सेनेची तलवार म्यान

Nashik: मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या उद्धव सेनेची तलवार म्यान

- संजय पाठक
नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा उध्दव सेनेने दिला खरा, मात्र पोलीसांनी कावाईचा इशारा देताच तलवार मान्य करण्यात आली आणि फडणवीस यांचीच भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. त्यामुळे उध्दव सेनेतच हा चर्चेचा विषय ठरला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर कुंभमेळ्याची कामे संथगतीने होत आहेत अद्याप पालकमंत्री नियुक्त नाही अशी कारणे देत उध्दव सेनेचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला हेाता. मात्र, पोलीसांनी त्यांना आंदेालन केल्यास कारवाईचा ईशारा दिला. त्यामुळे त्यांनी तलवार म्यान केली आणि पेालीसांच्या मध्यस्थीनेच कुंभमेळ्याची कामे लवकर करावी अशा मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हा प्रमुख डी. जी. सूर्यवंशी, पक्षाचे उपनेते सुनील बागूल, माजी महापौर विनायक पांडे, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, संदेश फुले, सचिन बांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Nashik: Shiv Sena's UBT sword sheathed, warning CM to show black flags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.