नाशिक-शिर्डी-नाशिक सायकल रॅली उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:35 IST2020-08-24T00:35:00+5:302020-08-24T00:35:22+5:30
जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि व्ही फिटनेस क्लब यांच्या वतीने गणेश चतुर्थीनिमित्त नाशिक-शिर्डी-नाशिक अशी १८० किलोमीटर सायकल रॅली काढण्यात आली.

नाशिक-शिर्डी-नाशिक सायकल रॅली सहगाभी सायकलपटू जतीन जोशी, अरुण भोये, मनोज महाले व ऋतिका गायकवाड. सोबत नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे पदाधिकारी.
नाशिक : जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि व्ही फिटनेस क्लब यांच्या वतीने गणेश चतुर्थीनिमित्त नाशिक-शिर्डी-नाशिक अशी १८० किलोमीटर सायकल रॅली काढण्यात आली.
कोरोनामुळे सध्या व्यायामशाळा बंद असल्याने आणि सायकलपटूंचा सराव व्हावा यासाठी ही रॅली काढण्यात आली. सायकलपटू मनोज महाले, जतीन जोशी, ऋतिका गायकवाड, अरुण भोये या सायकलपटूंनी या रॅलीत भाग घेतला. पाऊस असतानाही साडेपाच तासात ताशी सरासरी ३२ किलोमीटर या वेगाने या सायकलपटूंनी सायकल चालवली. स्वस्थ व निरोगी शरीरासाठी सायकलचा उपयोग आणि सायकलबाबत जनजागृती यासाठी लवकरच नाशिक-पुणे-मुंबई-नाशिक व नाशिक-अयोध्या-नाशिक अशा सायकल रॅलीही काढण्यात येणार आहेत. व्ही फिटनेस क्लबचे संचालक चैतन्य भोसले यांनी सायकलपटूंना मार्गदर्शन केले.
नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे पदाधिकारी राजेंद्र निंबाळते, नितीन नागरे, विजय देशमुख व दीपक भोसले यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.