शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

नाशिकरोड : प्रवाशांची गैरसोय; प्रबंधकांच्या आदेशाबाबत आश्चर्य व्यक्त रेल्वेस्थानकातील प्रवेशद्वार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 1:46 AM

नाशिकरोड : रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागून प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर जाणारा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, सामान घेऊन दूरवरून फेरफटका मारत रेल्वेस्थानकांत यावे-जावे लागत आहे.

नाशिकरोड : रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागून प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर जाणारा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, सामान घेऊन दूरवरून फेरफटका मारत रेल्वेस्थानकांत यावे-जावे लागत आहे. भुसावळ विभागाच्या प्रबंधकांनी प्रवेशद्वार बंद करण्याबाबत दिलेल्या आदेशाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कुंभमेळ्यास प्रवाशांची, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागून प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येण्या-जाण्यासाठी नवीन रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र दोन महिन्यांपूर्वी भुसावळ विभागाचे प्रबंधक आर. के. यादव यांनी रेल्वेस्थानकाची पाहणी करताना सुरक्षितेच्या कारणास्तव रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालयामागील प्लॅटफॉर्म एकवर येणारा-जाणारा रस्ता बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ तो मार्ग बंद करून टाकला. पार्सल कार्यालयाच्या परिसरात किंवा प्लॅटफॉर्मवरील पादचारी पुलावरून येणाऱ्या प्रवाशांना मुख्य रेल्वेच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडावे लागत आहे किंवा येणाºया प्रवाशांनादेखील फेरफटका मारत सामानाचे ओझे सांभाळत यावे लागत आहे.बंद केलेल्या रस्त्याशेजारील पार्सलचे कार्यालय असून, रेल्वे आल्यानंतर बहुतांश प्रवासी हे पार्सल कार्यालयातूनच ये-जा करतात. पार्सल कार्यालयाची जागा छोटी असून, प्रवासी ऐकत नाही. रेल्वेस्थानकातून बाहेर पडणाºया प्रवाशांची पार्सल कार्यालयातून जाताना मोठी गर्दी होत असल्याने तेथे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पार्सल विभागात काम करणारे कामगारदेखील त्रस्त झाले आहेत.प्रवाशांना घरी जाताना किंवा रेल्वेस्थानकांत येण्यासाठी जो रस्ता सोईस्कर आहे त्याच मार्गाने प्रवासी ये-जा करणार आहे ही बाब लक्षात घेऊन बंद केलेला रस्ता रेल्वे प्रशासनाने सुरू करावा, अशी मागणी रेल्वे प्रवासी, कामगार आदींनी केली आहे.

टॅग्स :railwayरेल्वे