Nashik: राज ठाकरे पुढील आठवड्यात नाशकात, संघटनात्मक चाचपणी, मनपा निवडणुकीची तयारी
By संजय पाठक | Updated: May 12, 2023 16:08 IST2023-05-12T16:07:33+5:302023-05-12T16:08:35+5:30
Raj Thackeray In Nashik: राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत वेगवेगळ्या प्रकारचे आडाखे बांधले जात असताना आता मनपा निवडणुका लवकरच होणार असल्याच्या चर्चा आहेत त्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढील आठवड्यात नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत.

Nashik: राज ठाकरे पुढील आठवड्यात नाशकात, संघटनात्मक चाचपणी, मनपा निवडणुकीची तयारी
- संजय पाठक
नाशिक- राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत वेगवेगळ्या प्रकारचे आडाखे बांधले जात असताना आता मनपा निवडणुका लवकरच होणार असल्याच्या चर्चा आहेत त्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढील आठवड्यात नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. 18 ते 20 मे च्या दरम्यान ते नाशिक मध्ये येणार आहेत राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता लवकरच महापालिकेच्या निवडणुका होतील असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे ते संघटनात्मक आढावा घेणार आहेत.
राज ठाकरे यांना नाशिक महापालिकेत सर्वप्रथम 2012 ते 20 17 सत्ता मिळाली होती. तसेच 2009 मध्ये नाशिक मधून तीन आमदार निवडून आले होते. त्यामुळेच आता राज यांनी पुन्हा नाशिक मध्ये लक्ष घातले आहे अशा प्रकारची माहिती देण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने आज राजगड येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीला माजी महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष दिलीप दातीर, प्रवक्ते पराग शिंत्रे, माजी जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.