नाशिकची मतदान यंत्रे बिहारला

By Admin | Updated: July 22, 2015 00:50 IST2015-07-22T00:48:23+5:302015-07-22T00:50:26+5:30

नाशिकची मतदान यंत्रे बिहारला

Nashik polling machines Bihar | नाशिकची मतदान यंत्रे बिहारला

नाशिकची मतदान यंत्रे बिहारला

नाशिक : लोकसभा निवडणुकीत वापरलेली जिल्ह्यातील मतदार यंत्रे वर्षाअखेर होऊ घातलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी रवाना करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी देशपातळीवर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील मतदारांसाठी बिहार व राजस्थान या राज्यातून मतदान यंत्रे मागविण्यात आली होती.
लोकसभा झाल्यानंतर राज्यात चार महिन्यांत पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्याने मतदानयंत्रांची मागणी वाढली. आता मात्र निवडणुका होऊन वर्ष उलटल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्ह्यात पाठविलेले साडेचार हजार मतदान यंत्रांपैकी साडेतीन हजार यंत्रे दोन दिवसांपूर्वी बिहारकडे रवाना करण्यात आले आहेत. आॅक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे.

Web Title: Nashik polling machines Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.