शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पोलिसांना सरते वर्ष फलदायी

By विजय मोरे | Updated: December 31, 2018 01:10 IST

नाशिक शहर तसेच ग्रामीण पोलिसांना २०१८ हे वर्ष फलदायी ठरले़ शहरातील वाहतूक नियमन करताना वाहनचालकांशी उडणाऱ्या खटक्यांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांना १२५ बॉर्डी वॉर्न कॅमेरे देण्यात आले़ याबरोबरच शहर व ग्रामीण पोलिसांच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा लावण्यात आली़

ठळक मुद्दे२०१८ मधील घडामोडी जीपीएसमुळे पोलीस वाहनास माहिती देऊन तत्काळ मदत

नाशिक : नाशिक शहर तसेच ग्रामीण पोलिसांना २०१८ हे वर्ष फलदायी ठरले़ शहरातील वाहतूक नियमन करताना वाहनचालकांशी उडणाऱ्या खटक्यांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांना १२५ बॉर्डी वॉर्न कॅमेरे देण्यात आले़ याबरोबरच शहर व ग्रामीण पोलिसांच्या वाहनांना जीपीएस यंत्रणा लावण्यात आली़ यामुळे ज्या ठिकाणी घटना घडली असेल तिथे जवळ असलेल्या पोलीस वाहनास माहिती देऊन तत्काळ पोलीस मदत पोहोचण्यासाठी पाठविणे शक्य झाले़ याबरोबरच पोलीस आयुक्तालयाकडून जिल्हा न्यायालयास मिळालेल्या अडीच एकर जागेतील बॅरेकमध्ये चार न्यायालये सुरू करण्यात आली आहेत.'पोलिसांना १२५ बॉडी वॉर्न कॅमेरेशहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे तसेच कारवाईत पारदर्शकता यावी तसेच वाहनचालकांसोबत कटू प्रसंग टळावेत यासाठी एप्रिल - २०१८ मध्ये शहर वाहतूक पोलिसांना १२५ ‘बॉडी वॉर्न’ कॅमेरे देण्यात आले़ आमदार हेमंत टकले यांच्या आमदार निधीतून मिळालेल्या या कॅमेºयांचे वाटप पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात आले. पूर्वीचे पाच आणि नव्याने १२५ असे एकूण १३० कॅमेरे वाहतूक शाखेकडे आहेत़ या कॅमेºयाने सलग आठ तास चित्रीकरण करता येते. या चित्रीकरणाची गुणवत्ता तीन मेगा पिक्सल इतकी असून साठवण क्षमता ३२ जीबी इतकी आहे़ या कॅमेºयातून २१ मेगा पिक्सल दर्जापर्यंतचे छायाचित्र काढता येते़ तसेच ते धूळ आणि जलरोधकही आहेत.शहरातील पोलीस वाहनांना जीपीएसशहर पोलीस आयुक्तालयात गस्तीवरील आणि पोलिसांसाठी वापरण्यात येणाºया इतर वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी शहर पोलिसांच्या वाहनांवर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) प्रणाली बसविण्यात आली़ यामध्ये १३ पोलीस स्टेशनमधील प्रत्येकी पाच वाहनांचा, निर्भया व्हॅन, टूरिस्ट पोलीस, पीसीआर मोबाइल आदी वाहनांचा समावेश आहे. जीपीएसद्वारे एखादे वाहन कोठे उभे आहे, कोणत्या दिशेने चालले आहे, एखाद्या ठिकाणी किती वेळापासून उभे आहे, दिवसभरात किती फिरले याची सविस्तर माहिती मिळते. यासाठी शहर नियंत्रण विभागात कंट्रोल स्टेशनही सुरू करण्यात आले असून मोबाइल अ‍ॅपही विकसित केले आहे़ या यंत्रणेमुळे पोलीस वाहनांच्या प्रवासाची तंतोत माहिती उपलब्ध होते, तसेच वायरलेसद्वारे संदेश देण्यास अडचणी आल्या तर मोबाइलवर वाहनातील पोलिसांना कॉल करता येणे शक्य होते़ शहराचा विस्तार मोठा असल्याने पोलिसांचे वाहन नक्की कोठे आणि काय करते हे यामुळे समोर येते. एखादी घटना समजल्यानंतर पोलिसांनी कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचणे महत्त्वाचे असते. अशा वेळी नियंत्रण कक्षातील टेलिव्हिजन स्क्रीनवर घटनास्थळ पाहून नजीक दिसणाºया वाहनास त्या ठिकाणी पाठवणे सोपे होते़जिल्हा न्यायालयास मिळालेल्या अडीच एकर जागेचा वापरमुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा न्यायालयाच्या पश्चिमेकडील पोलीस मुख्यालयाची अडीच एकर जागा सप्टेंबर २०१७ मध्ये जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी जिल्हा न्यायालयास हस्तांतरित केली़ या जागेसाठी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडून २००० पासून प्रयत्न सुरू होते. क़ का़ वाघ यांनी केलेल्या जनहित याचिकेनंतर वकिलांच्या प्रयत्नांना यश आले व जागा मिळाली़४पोलिसांकडून मिळालेल्या या प्रत्यक्ष जागेचा वापर२०१८ पासून सुरू करण्यात आला़ सिंहस्थ कालावधीततयार करण्यात आलेल्या या जागेवरील बराकमध्ये चारन्यायालये स्थलांतरित करण्यात आली़ तसेच या ठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध असल्याने बहुतांशी वकील व पक्षकारांची वाहने या अडीच एकर जागेमध्ये लावलीजातात़ येत्या नवीन वर्षात या ठिकाणी न्यायालयासाठीनवीन बहुमजली इमारत बांधण्याचे काम सुरू होणारआहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस