शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

नाशिक पोलीस : पोलीस हवालदार तिडके यांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:13 IST

पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात मोटारचालक तिडके यांचे चुलत सासरे रमेश सोनवणे (रा. खेडगाव) यांचाही मृत्यू झाला. उर्वरित दोन प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्दे पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास अपघातपार्थिवावर मूळ गावी कसबे-सुकेणे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार मोटारीवरील नियंत्रण सुटले व मोटार दुभाजकावर जाऊन आदळली

नाशिक : येथील पोलीस नियंत्रण कक्षामध्ये नेमणूक असलेले बबनराव निवृत्ती तिडके (५१) यांचे रविवारी (दि.४) मंचरजवळ महामार्गावर अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे या मूळ गावी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, तिडके हे पुणे येथे हरविलेल्या भाचीला आणण्यासाठी नातेवाइकांसोबत गेले होते. तेथून परतीचा प्रवास करताना त्यांची मोटार (एम.एच १५ ईअ‍े ५१५१) मंचर शिवारात पोहचली असता भोरवाडीजवळ मोटारीपुढे अचानक कुत्रा आडवा पळाल्यामुळे त्यांच्या सास-यांचा मोटारीवरील नियंत्रण सुटले व मोटार दुभाजकावर जाऊन आदळली. पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात मोटारचालक तिडके यांचे चुलत सासरे रमेश सोनवणे (रा. खेडगाव) यांचाही मृत्यू झाला. उर्वरित दोन प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिडके हे मागील वर्षभरापासून पोलीस नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत होते. ते पंचवटीमधील हनुमाननगर येथे कुटुंबासमवेत राहत होते. १९८८ साली नाशिक पोलीस दलात तिडके भरती झाले होते. १९९१ साली आयुक्तालय अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी पंचवटी, नाशिकरोड, शहर वाहतूक शाखेत नोकरी केली. शेतकरी कुटुंबातून तिडके पुढे आले होते. त्यामुळे सामाजिक प्रश्नांची त्यांना जाणीव होती. त्यांनी पोलीस दलात सेवा करताना सामाजिक संबंधही तितकेच जोपासले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, दोन भाऊ, जावई, असा परिवार आहे. मुलगा बारावीला शिकत आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी कसबे-सुकेणे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMancharमंचर