मुसळधार पावसामुळे नाशिकमधील गोदाकाठ पाण्याखाली, भाविकांनी केशार्पण-पिंडदान केलं रस्त्यावरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 13:23 IST2017-09-20T12:32:35+5:302017-09-20T13:23:15+5:30
नाशिकमध्ये सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धरणांमधून केलेल्या पाण्याचा विसर्गाचा फटका देशभरातून पिंडदानासाठी आलेल्या भाविकांना बसला आहे. पावसामुळे संपूर्ण गोदाकाठ पाण्याखाली गेल्याने भाविकांनी धार्मिक विधी वसतांतर गृहाजवळ तसंच रस्त्यावरच केल्या.

मुसळधार पावसामुळे नाशिकमधील गोदाकाठ पाण्याखाली, भाविकांनी केशार्पण-पिंडदान केलं रस्त्यावरच
नाशिक, दि. 20 - नाशिकमध्ये सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धरणांमधून केलेल्या पाण्याचा विसर्गाचा फटका देशभरातून पिंडदानासाठी आलेल्या भाविकांना बसला आहे. पावसामुळे संपूर्ण गोदाकाठ पाण्याखाली गेल्याने भाविकांनी धार्मिक विधी वसतांतर गृहाजवळ तसंच रस्त्यावरच केल्या. शहर परिसर तसेच त्र्यंबक येथे मंगळवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे रामकुंडावरील बहुतांश व्यवहार ठप्प झाले आहेत.
आज सर्वपित्री आमावस्या आहे. पितृ पंधरवड्याचा शेवटचा दिवस असल्याने देशभरातून हजारो भाविक गोदाकाठी दाखल झाले आहेत. मात्र, पावसामुळे धार्मिक विधि करण्यात अडथळा येत आहे. दरम्यान, रामकुंड परिसरातील रस्त्यावरच केशार्पण, पिंडदान रस्त्यावर सुरु झाल्याने इथली वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर नो एन्ट्री करण्यासह विविध उपाययोजना करत पोलिसांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.