पंचवटीतील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 17:14 IST2017-11-29T17:13:09+5:302017-11-29T17:14:06+5:30

पंचवटीतील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
नाशिक : पंचवटीतील ड्रीम कॅसल येथे बसविण्यात आलेले सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या घटनेमुळे परिसरातील बँकांच्या एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़
अशोका मार्गावरील आम्रपाली टॉवरमधील रहिवासी संगीता म्हात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटीतील मोरे मळ्याजवळ असलेल्या ड्रीम कॅसल सोसायटीच्या चौदा नंबरच्या गाळ्यात सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे एटीएम आहे़ रविवारी (दि़ २६) रात्री ८ ते सोमवारी (दि़ २७) सकाळी १० वाजेच्या कालावधीत चोरट्यांनी एटीएम तोडून त्यामधील कॅश चोरण्याचा प्रयत्न केला़ मात्र चोरट्यांना यश आले नाही़
या प्रकरणी म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत़