Nashik: मालेगावमध्ये नमाज पठणाच्यावेळी फडकावला पॅलेस्टीनचा ध्वज
By प्रसाद गो.जोशी | Updated: April 11, 2024 14:17 IST2024-04-11T14:16:55+5:302024-04-11T14:17:35+5:30
Nashik News: येथील इदगाह मैदानामध्ये रमजान ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण झाले. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती महंमद हे उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना अचानक एक तरुण उठला आणि त्याने पॅलेस्टाइनचा ध्वज फडकावत थेट मंचाकडे कूच केले.

Nashik: मालेगावमध्ये नमाज पठणाच्यावेळी फडकावला पॅलेस्टीनचा ध्वज
मालेगाव (जि. नाशिक) : येथील इदगाह मैदानामध्ये रमजान ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण झाले. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती महंमद हे उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना अचानक एक तरुण उठला आणि त्याने पॅलेस्टाइनचा ध्वज फडकावत थेट मंचाकडे कूच केले. तो उपस्थितांमधून चालत थेट मंचासमोर ध्वज घेऊन आला. त्याला कोणी रोखले नाही.
मालेगावला रमजान इदचा सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने येथील इदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण झाली. या कार्यक्रमाला शहराचे आमदार असलेले मौलाना मुफ्ती महंमद उपस्थित होते. आपल्या भाषणात मौलाना हे पॅलेस्टाइनवर होत असलेल्या अन्यायाबाबत बोलत असताना समोर बसलेल्यांपैकी पाठीमागे बसलेला एक तरूण उठला आणि त्याने पॅलेस्टाइनचा झेंडा फडकावत थेट मंचाकडे कूच केले. त्याला कोणी रोखले नाही वा त्याने काही घोषणाही दिल्या नाहीत. याबाबत आमदार मुफ्ती यांना विचारले असता, या तरुणाचा आणि आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले.