शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: अरे देवा! महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:15 IST

महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोराने चोरल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण, पतीनेच मंगळसूत्र चोरल्याची बातमी ऐकली का?

Nashik Crime News: महिला भाजीपाला घेऊन घरी निघाली होती. त्याचवेळी तिच्याजवळ एक दुचाकी थांबली. दुचाकीवरील व्यक्ती महिलेच्या जवळ आला. तिला मारहाण केली आणि गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि मोबाईल घेऊन पसार झाला. हा व्यक्ती महिलेचा पतीच होता. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भाजीपाला घेऊन पायी चालत असताना पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र व मोबाईल घेऊन पतीने धूम ठोकली. हे दाम्पत्य गेल्या काही दिवसांपासून विभक्त राहत होते. 

पाथर्डी शिवारातील अहिल्यामाता नगर परिसरात ही घटना घडली. इंदिरानगर पोलिस ठाण्यात पत्नीने पतीविरुद्ध दिलेल्या तक्रारीनंतर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती आणि पत्नीमध्ये काय घडलं?

वैशाली पांडव (वय ३७) व त्यांचे पती संतोष पांडव (रा. सिडको) यांच्यात वाद झाल्याने ते विभक्त राहत होते. पत्नी व मुलांना मारहाण करून त्यांना धमकाविण्याचे काम संतोष हा करीत होता. 

वैशालीने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यान्वये तक्रार दाखल केली होती. बुधवारी (दि.११) वैशाली पांडव संध्याकाळी साडेआठ वाजता भाजीपाला आणण्यासाठी पाथर्डीगाव बाजारात गेल्या होत्या. 

आधी मारहाण, नंतर मंगळसूत्र घेऊन फरार

पायी चालत जात असताना अहिल्यामाता नगर येथील गल्लीत अचानक त्यांचे पती संतोष पांडव हे दुचाकीवरून आले. गाडीवरून उतरून वैशाली पांडव यांना चापटाने मारहाण करायला सुरुवात केली. मंगळसूत्र तसेच मोबाईल घेऊन तेथून धूम ठोकली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकChain Snatchingसोनसाखळी चोरीPoliceपोलिस