शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: अहो आश्चर्यम, आता विहिरीतील पाण्याचीही चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 17:14 IST

Nashik: येवला तालुक्यातील कातरणी येथील नामदेव कारभारी कदम यांच्या विहिरीतील पंधरा फूट पाणी अज्ञात चोरट्यांनी उपसून नेल्याने शेतकऱ्याला पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

- भाऊराव वाळकेजळगाव नेऊर, ता. येवला (जि. नाशिक) : आतापर्यंत आपण घरातील चोरी, दुकानातली चोरी, बँकेतील चोरी किंवा शेतातील शेतमालाची चोरी बघितली आहे; पण येवला तालुक्यातील कातरणी येथील नामदेव कारभारी कदम यांच्या विहिरीतील पंधरा फूट पाणी अज्ञात चोरट्यांनी उपसून नेल्याने शेतकऱ्याला पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

कातरणी येथील शेतकरी नामदेव कारभारी कदम यांनी तळेगाव शिवारात असलेल्या शेतकऱ्याकडून विकत पाणी घेऊन पंधरा फूट पाणी घरापासून एक किलोमीटर दूर असलेल्या विहिरीत पिण्यासाठी व जनावरांसाठी साठवले होते; पण अज्ञातांनी मध्यरात्री पाणी चोरून नेल्याने शेतकऱ्यावर ऐन दुष्काळात पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. सध्या येवला तालुक्यात खरीप हंगामातील पिके होरपळून गेली असून विहिरीत, शेततळ्यात साठवलेल्या पाण्यावर शेतकरी स्वतःची तहान भागवून जनावरांची तहान भागवत आहे आणि उरलेल्या पाण्यावर कांद्याची रोपे स्प्रिंकलरच्या साहाय्याने जगवत आहे. जनावरांसाठी व पिण्यासाठी ठेवलेले पाणी शेतकरी नामदेव कदम हे सकाळी जनावरांना पाणी काढण्यासाठी विहिरीवरती गेले असता, त्यांना फक्त विहिरीत अर्धाच फूट पाणी शिल्लक दिसले. गेल्या दोन महिन्यांपूर्वी या शेतकऱ्याच्या वस्तीवर भर दुपारी दोन ते तीन लाख रुपये किमतीचे दागिने व घरातील इतर वस्तू चोरीला गेल्या होत्या. अजून त्याचाही तपास लागलेला नसून ही घटना घडली. गेल्या १५ दिवसांपूर्वी गोकूळ भास्कर जाधव यांच्या शेततळ्यात असलेली ३ फेज मोटर चोरीला गेली होती. या चोरीचे सत्र सुरू असताना चोरट्यांनी विहिरीतील पाण्यावर डल्ला मारल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

आमचा परिसर हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून असून, पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. साठवलेल्या पाण्यावर पिण्याचा पाण्याचा, जनावरांचा प्रश्न मिटवावा लागतो; पण ऐन दुष्काळात अज्ञात चोरट्यांनी विहिरीतील पंधरा फूट पाणी उपसून नेल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांची पंचायत झाली आहे.- नामदेव कदम, कातरणी शेतकरी

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी