शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

नाशिकमध्ये कोणीही कोरोनाबाधित नाही; आज तीन संशयित दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 18:18 IST

आजपर्यंत पुण्याच्या प्रयोगशाळेत एकूण ६८ कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्दे६४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह कोरोना संक्रमित रुग्णाच्या एकही व्यक्ती संपर्कात नाही

नाशिक : शहरासह जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्ह्यात अद्याप ५६८नागरिक कोरोनाग्रस्त देशांमधून दाखल झाले आहेत. १५४ नागरिकांचे १४ दिवसांचे सर्वेक्षण प्रशासनाने पुर्ण केले आहे. आजपर्यंत पुण्याच्या प्रयोगशाळेत एकूण ६८ कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. कोरोना संक्रमित रुग्णाच्या अद्याप एकाही व्यक्ती संपर्कात आलेला नाही, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.अद्याप चारशेपेक्षा अधिक नागरिकांचे दैनंदिन सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. आज नव्याने दाखल झालेले तीन व कालचा एक अशा चार संशयितांचे अहवाल प्रलंबित आहे.कोरोना आजाराचा फैलाव देशासह राज्यात वेगाने होऊ लागला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता १६७ झाला असून, त्यापैकी पाच रुग्ण दगावले आहेत. सुदैवाने अद्याप नाशिकमध्ये कोणीही व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आली नाही. तसेच कोणीही कोरोना संक्रमित रू ग्णालच्या संपर्कात आले नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. कोरोना संशयित रुग्ण मात्र दररोज आढळून येत असून, त्यांच्यावर सरकारी दवाखान्यातील विलगीकरण कक्षात उपचारही सुरू आहेत. मुंबई, पुणे, सांगली, सातारा आदी शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. शहरात लॉकडाउन कालावधीत कोणीही रस्त्यावर फिरकणार नाही, याची पूर्णपणे खबरदारी घेतली जात आहे. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह घरात थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यामुळे नागरिकांना सातत्याने घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. दूध, भाजीपाला, किराणा माल, गोळ्या-औषधे, अन्नधान्य, पिठाची गिरणी यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीनेच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य