नाशिकमध्ये मनसेने जाळला पाकचा झेंडा
By सुयोग जोशी | Updated: April 23, 2025 15:04 IST2025-04-23T15:03:06+5:302025-04-23T15:04:28+5:30
Nashik News: काश्मीर खोऱ्यातील पहलगाम परिसरात पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या निषेधार्थ बुधवारी (दि.२३) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला.

नाशिकमध्ये मनसेने जाळला पाकचा झेंडा
- सुयोग जोशी
नाशिक - काश्मीर खोऱ्यातील पहलगाम परिसरात पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या निषेधार्थ बुधवारी (दि.२३) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, सलिम शेख, सुदाम कोंबडे, सुजाता डेरे, अंकूश पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात देशातील २७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना मनसेने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत तिव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पाकविरोधात घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा जाळला. तसेच हा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडून त्यांना शिक्षा करण्यात यावी अशी प्रतिक्रिया दिनकर पाटील यांनी दिली आहे.