शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

पर्यटनासाठी नाशिक जिल्हा मॉडेल म्हणून विकसीत करण्याची गरज: दत्ता भालेराव

By संजय पाठक | Published: March 07, 2020 11:29 PM

नाशिक- महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी १४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे राज्य सरकारला पर्यटन विषयक गांभिर्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने आता नाशिक सारखा सुवर्ण त्रिकोणातील एक जिल्हा पर्यटनासाठी मॉडेल म्हणून विकसीत करावा अशी मागणी नाशिक येथील पर्यटन व्यवसायिकांच्या संघटनेचे (तान) माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी केली आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पातील भरीव तरतूद स्वागतार्हपर्यटनामुळे रोजगार वाढेल

नाशिक- महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी १४०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे राज्य सरकारलापर्यटन विषयक गांभिर्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने आता नाशिक सारखा सुवर्ण त्रिकोणातील एक जिल्हा पर्यटनासाठी मॉडेल म्हणून विकसीत करावा अशी मागणी नाशिक येथील पर्यटन व्यवसायिकांच्या संघटनेचे (तान) माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी केली आहे. भालेराव यांनी राज्यातील आणि नाशिकमधील पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : राज्य सरकारच्या वतीने अर्थसंकल्पात केवळ पर्यटनासाठी करण्यात आलेल्या तरतूदींविषयी काय वाटते ?भालेराव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात पर्यटन व्यवसायाची व्याप्ती व क्षमता लक्षात घेऊन सुमारे १४०० कोटी रूपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्राला दिलासा देणारी ही बाब आहे. मात्र त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे राज्य सरकारला या क्षेत्राचे महत्व कळाले हे खूप महत्वाचे आहे. मुळात आदित्य ठाकरे यांनी नवीन मंत्री मंडळात या व्यवसायाची धुरा सांभाळली, तेव्हाच काही तरी सकारात्मक होईल अशी अपेक्षा होती. त्यानुसार अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात १४०० कोटी रूपयांची तरतूद करून देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सज्ज करण्याची तयारी केली आहे.प्रश्न: पर्यटनविषयक तरतूदीचा काय फायदा होईल असे वाटते ?भालेराव: निसर्गाने महाराष्टÑावर साधन संपत्तीची मुक्त उधळण केली आहे. ऐतिहासीक गड किल्ले, पुरातन मंदिरे, ७२० किलो मीटरचा अथांग सागर किनारा, बारमाही उत्तम हवामान, उद्योग व्यवसायानिमित्त जगाच्या कानाकोपऱ्यातून येणारे नागरीक, नैसर्गिक बंदरे, या माध्यमातून नियोजनबध्द विकास केलाच तर पर्यटन हा राज्याचा प्रमुख व्यवसाय होऊ शकतो. या माध्यमातून लाखो युवकांना रोजगार मिळू शकतो. इतकी पर्यटन क्षेत्राची ताकद आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील तरतूदीचा योग्य कामासाठी वापर करावा, पर्यटनासाठी सरकारने रस्ते बांधणीवर भर द्यावा असे वाटते.प्रश्न: पर्यटनाचा नाशिकच्या दृष्टीने काय उपयोग होऊ शकतो.भालेराव: सुवर्ण त्रिकोणातील शहर म्हणून नाशिकचे विशेष महत्व आहे. येथे धार्मिक पर्यटन आहे, त्याच बरोबर गड किल्ले आहेत. अ‍ॅग्रो आणि वाईन टुरिझम देखील आहे. महत्वाचे म्हणजे मुंबई- पुण्याहून जवळ आहे. दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्य सरकारने निधीची तरतूद केल्यानंतर संपूर्ण राज्यातील पर्यटन क्षेत्राचा एकावेळी कायापालट शक्य नसला तरी नाशिकला एक मॉडेल जिल्हा म्हणून विकसीत केले तरी उपयुक्त ठरू शकेल. एक जिल्हा असा मॉडेल ठरला तर अन्यत्र देखील याच धर्तीवर विकास होऊ शकेल. नाशिकमध्ये या आधीही पर्यटनाच्या अनेक योजना आल्या होत्या. परंतु काही साकारल्या गेल्या तर काही पुढे जाऊ शकल्या नाही.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकState Governmentराज्य सरकारbudget 2020बजेटtourismपर्यटन