शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नाशिक महापालिकेत नगरसेवकांसह नागरिकांना शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा जाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 18:11 IST

नागरिकांची अडवणूक : स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य आक्रमक

ठळक मुद्देमहापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरात प्रशासनाने महाराष्ट सुरक्षा मंडळाचे शस्त्रधारी सुरक्षारक्षक तैनातनगरसेवकांची अंगझडती घेण्यापासून ते आपल्या प्रश्नांसाठी दाद मागण्याकरिता येणाऱ्या  सामान्य नागरिकांची अडवणूक

नाशिक : महापालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्ट सुरक्षा मंडळाच्या शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा जाच नगसेवकांसह सामान्य नागरिकांनाही वाढू लागल्याने त्याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. महापालिकेत कर्फ्यू लागला की काय, अशी स्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सभापतींनी केवळ आयुक्तांच्याच दालनापुढे शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमावेत, असे आदेशित केले.महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरात प्रशासनाने महाराष्ट सुरक्षा मंडळाचे शस्त्रधारी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत नगरसेवकांची अंगझडती घेण्यापासून ते आपल्या प्रश्नांसाठी दाद मागण्याकरिता येणाऱ्या  सामान्य नागरिकांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. शुक्रवारी (दि. २४) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष व स्थायीचे सदस्य प्रवीण तिदमे यांनी सदर शस्त्रधारी सुरक्षारक्षकांच्या नेमणुकीस पुन्हा एकदा ठामपणे विरोध दर्शविला. स्थायी समितीने मुख्यालयात केवळ आयुक्तांच्या दालनापुढे दोन शस्त्रधारी सुरक्षारक्षक नियुक्तीचे आदेशित केले असताना २८ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. सदर सुरक्षारक्षकांना तातडीने हटविण्याची मागणी तिदमे यांनी केली. सूर्यकांत लवटे यांनी महापालिकेला पोलिसी छावणीचे स्वरूप आल्याचे सांगत पोलीस दलात रिजेक्ट झालेल्या या सुरक्षारक्षकांच्या प्रशिक्षणाबद्दलही शंका उपस्थित केली. डी. जी. सूर्यवंशी यांनी महापालिकेत कर्फ्यू लागल्याची स्थिती निर्माण झाल्याचे सांगत स्थायीने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, महापालिकेत सहा गनधारी व ११ सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, उर्वरित सुरक्षारक्षकांची नियुक्ती जलशुद्धीकरण केंद्रांवर करण्यात आल्याचे सांगितले. अतिरेकी कारवारांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु महापालिका हे सार्वजनिक ठिकाण असून, याठिकाणी रोज शेकडो नागरिक आपल्या समस्या घेऊन येत असतात. यापूर्वी महापालिकेला अशा सुरक्षारक्षकांची कधीही गरज भासली नाही; मग आताच एवढी भीती का वाटते आहे, असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला. सदर सुरक्षारक्षक तातडीने महापालिका मुख्यालयातून हलवावे, अशी मागणीही सदस्यांनी केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका