शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मनपाच्या महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद भाजपाकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 15:44 IST

नाशिक- नाशिक महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदासाठी भाजपाच्या हेमलता कांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे

ठळक मुद्दे कांडेकर यांचा एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध निवड निश्चीतअन्य समित्यांमध्ये शिवसेनेचे आव्हानयुती धर्म निभावण्याची शिवसेनेला अपेक्षा

नाशिक-नाशिक महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदासाठी भाजपाच्या हेमलता कांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहेमहापालिकेच्या चार विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी बुधवारी (दि.१७) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून भाजपाचे बहुमत असतानाही शिवसेनेने देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे युतीतच रस्सीखेच होणार आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, शहर सुधार समिती तसेच वैद्यकिय सहाय्य व आरोग्य समिती सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणूका गुरूवारी (दि.१८) होणार आहे. त्यासाठी बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. प्रत्येक समितीत एकुण नऊ सदस्य असून त्यातील पाच सदस्य भाजपाचे असल्याने समितीवर याच पक्षाचे वर्चस्व आहे. परंतु भाजपा बरोबरच सेनेने देखील अर्ज भरले आहेत. देशात आणि राज्यात महापालिकेची युती आहे. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेत देखील युती व्हावी त्यासाठी सेनेलाही सत्तेचा वाटा मिळावा या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी सांगितले.समित्या आणि त्यात अर्ज दाखल करणाऱ्यांची नावे पुढिल प्रमाणे-महिला व बाल कल्याण समिती- सभापतीपद- हेमलता कांडेकर (भाजपा) उपसभापती- रंजना प्रकाश बोराडे (शिवसेना), डॉ. सीमा ताजणे (भाजपा)वैद्यकिय सहाय्य व आरोग्य समिती- सभापती- चंद्रकांत खाडे (शिवसेना), अंबादास पगारे व डॉ. दिपाली कुलकर्णी (दोघेही भाजपा) उपसभापती- चंद्रकांत खाडे (शिवसेना), अंबादास पगारे व पुनम धनगर (भाजप)शहर सुधार समिती- सभापती- सुदाम डेमसे (शिवसेना), अनिल ताजनपुरे (भाजपा), उपसभापती- सुदास डेमसे (शिवसेना), छाया देवांग (भाजपा)विधी समिती- सभापती- चंद्रकांत खाडे (शिवसेना), सुमन सातभाई (भाजपा), उपसभापती- चंद्रकांत खाडे व सूर्यकांत लवटे (शिवसेना), नीलेश ठाकरे (भाजपा)

 

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपा