मनोज मालपाणी
नाशिकरोड : येथील सहा प्रभागांतील २३ जागांपैकी १० जागा उद्धवसेनेने जिंकून नाशिकरोडचा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असलेला बालेकिल्ला पूर्ण शाबूत ठेवता आलेला नाही. विभागात भाजपाला ९ व शिंदेसेनेला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
भाजपचे नेते, पदाधिकाऱ्यांचा वधारलेला भाव भाजपनेच काही प्रमाणात उतरवला आहे; तर राष्ट्रवादी शरद पवार, अजित पवार, काँग्रेस, रिपाइंचे विविध गट यांचा सुपडासाफ झाला आहे. मनसेने निवडणूकच लढविली नाही; तर देवळाली मतदारसंघातील प्रभाग १९ व २२ ची भाजपाकडून बबनराव घोलप व राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून आमदार सरोज अहिरे यांच्यावर जबाबदारी सोपवलेली असताना त्यांचा सर्व हिशेब उद्धवसेनेने चुकता केला आहे.
प्रभाग १७ मध्ये भाजपचे एकमेव प्रशांत दिवे व उद्धवसेनेचे मंगला आढाव, शैलेश ढगे, प्रमिला मैंद यांनी विजयाला गवसणी घातली आहे. प्रभाग १८ मध्ये भाजपचे विशाल संगमनेरे, शरद मोरे व शिंदेसेनेच्या रंजना बोराडे, सुनीता सागर भोजने हे निवडून आले. प्रभाग १९ मध्ये उद्धवसेनेचे योगेश भोर, भारती ताजनपुरे, रुचिस संतोष साळवे हे तिघे एकत्र राहिल्याने निवडून आले. प्रभाग २० मध्ये वाढलेले इच्छुक व अंतर्गत धुसफुसच भाजपच पाय ओढत होती.
भाजपच्या डॉ. सीमा ताजणे, सतीश निकम, जयश्री गायकवाड विजयी झाल्या तर शिंदेसेनेच कैलास मुदलीयार यांनी भाजपचे अनुभवी नेते संभाज मोरुस्कर यांना चितपट केले, प्रभाग २१ मध्ये शिंदेसेनेव रमेश धोंगडे हे एकमेव विजयी झाले. भाजपच्या श्वेता भंडारी, अॅड. कोमल मेहरोलिया, जयंत जाचक विजयी झाले. प्रभाग २२ मध्ये उद्धवसेनेचे योगेश गाडेकर, केशब पोरजे, संजीवनी हांडोरे, वैशाली दाणी हे संपूर्ण पॅनल विजयी झाल्याने भाजपचा सुपडासाफ झाला. भाजप शिंदेसेनेने उद्धवसेना खिळखिळी केली असताना नाशिकरोडला सर्वाधिक १० उमेदवार निवडून आणले. शिंदेसेनेला चारच जागांवर विजय मिळाल्याने काही जागांवरील पराभव हा त्यांना चटका देणारा ठरला आहे.
Web Summary : Uddhav Sena won 10 seats in Nashikroad, becoming the largest party. BJP secured 9, and Shinde Sena 4. Internal strife hurt BJP, while Uddhav Sena dominated wards 19 and 22, sweeping BJP out.
Web Summary : नाशिकरोड में उद्धव सेना ने 10 सीटें जीतीं, सबसे बड़ी पार्टी बनी। भाजपा को 9 और शिंदे सेना को 4 सीटें मिलीं। आंतरिक कलह ने भाजपा को नुकसान पहुंचाया, जबकि उद्धव सेना ने वार्ड 19 और 22 में भाजपा का सफाया कर दिया।